• Download App
    ग्रामीण भागात लसीकरण मोहीम वेगाने राबविणार; लस न घेणाऱ्यांवर कठोर निर्बंधांचा सरकारचा विचार । Vaccination campaigns will be expedited in rural areas; Government considers strict restrictions on non-vaccinators

    ग्रामीण भागात लसीकरण मोहीम वेगाने राबविणार; लस न घेणाऱ्यांवर कठोर निर्बंधांचा सरकारचा विचार

    वृत्तसंस्था

    मुंबई : कोरोना, ओमीक्रोनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लसीकरण मोहीम अधिक वाढविण्यावर भर दिला जाणार असून लस न घेणाऱ्यांवर निर्बंधांचा विचार सरकार करत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. Vaccination campaigns will be expedited in rural areas; Government considers strict restrictions on non-vaccinators



    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दोन लसीचे डोस घेतलेल्यांना संसर्गाची तीव्रता सौम्य आहे. सध्या रुग्णालयात दाखल होत असलेले बहुतांश लोकांनी लस घेतलेली नाही तसेच प्राणवायूची गरज भासणारे सर्व कोरोनाबाधित हे लस न घेतलेलेच आहेत. लसीबाबत उदासीन असलेल्या लोकांबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागात परिस्थिती बिकट होण्यापूर्वीच भीती लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा तसेच लस न घेणाऱ्यांवर कडक निर्बंध व त्यांना सरकारी योजनांपासून वंचित करण्याचा कठोर निर्णय घेण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे.

    Vaccination campaigns will be expedited in rural areas; Government considers strict restrictions on non-vaccinators

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Piyush Goyal : भारताची टॉफी निर्यात 12 वर्षांत 166% वाढली; आर्थिक वर्ष 2026 मध्ये ₹132 कोटींवर, मंत्री पीयूष गोयल यांनी डेटा जारी केला

    भारत – सायप्रस यांच्यात संरक्षण, गुंतवणूक, सायबर सुरक्षा आणि व्यापार विकास करार; राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या!!

    Manoj Jarange : समाजाशी दगाफटका करू नका, 23 मेपूर्वी चर्चेला या; प्रसाद लाडांच्या शब्दावर विश्वास ठेवून गावागावातील बैठका थांबवल्या- मनोज जरांगे