अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत सर्व वाहनांनी पेट घेतला होता.दरम्यान जवानांनी तातडीने ही आग विझविली. PUNE: A fire broke out in the parking lot of a building in Shivne, burning 13 two-wheelers and 2 rickshaws
विशेष प्रतिनिधी
पुणे : शिवणे येथील शिवकमल प्रेस्टीज या इमारतीच्या पार्किंगमधील १३ दुचाकी आणि २ रिक्षा आगीत जळून खाक झाली.दरम्यान ही घटना बुधवारी पहाटे ५ वाजता घडली.शिवकमल प्रेस्टीज ही ५ मजली इमारत आहे.पार्किंगमधील वाहनांना पहाटे ५ वाजता आग लागल्याची खबर अग्निशमन दलाला मिळाली.दरम्यान अग्निशामक दल व पीएमआरडीएच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या.
दरम्यान तोपर्यंत सर्व वाहनांनी पेट घेतला होता.दरम्यान जवानांनी तातडीने ही आग विझविली.अग्निशमन दलाचे अधिकारी उमराटकर यांनी सांगितले की, पार्किंगमध्ये अनेकदा शॉट सर्किट होतात आणि आग लागते.अशीच आग तेथील वाहनांना आग लागल्याचे दिसून येते. मात्र, या इमारतीतील विद्युत मीटरच्या बॉक्सपर्यंत आग पोहचलीच नाही.त्यामुळे तेथून आग लागली नाही.
दरम्यान ज्या वाहनाला पहिली आग लागली, त्याच्यावर पार्किंगमधील ट्युबलाईट जळाली आहे. या इमारतीतील नागरिकांनी सांगितले की, ट्युबलाईट फुटल्याचा आवाज आल्याने आम्ही सगळे खाली आलो, आणि पाहतोय तर सर्व वाहने एकाचवेळी पेटलेली होती. त्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावली असावी, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला.
PUNE: A fire broke out in the parking lot of a building in Shivne, burning 13 two-wheelers and 2 rickshaws
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील संसर्ग दर चिंताजनक : राजेश टोपे; भीती बाळगू नका, काळजी घेण्याचे आवाहन
- भायखळ्यात गोडाऊनला लागली भीषण आग , तब्बल ४ तास आग विझवण्यासाठी झुंज
- घसा खवखवला तर समजावे, हे ओमीक्रॉनचे प्रमुख लक्षण ; तज्ञांचा खुलासा; लस घेतलेल्यांनाही संसर्ग
- भोसरी एमआयडीसी प्रकरण, मंदा खडसे यांना १७ फेब्रुवारीपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश