• Download App
    केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण । Union Minister of State for Railways Raosaheb Danve infected with corona

    केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण

    दोन दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. Union Minister of State for Railways Raosaheb Danve infected with corona


    विशेष प्रतिनिधी

    जालना : राज्यातील मंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय मंत्री देखील कोरोना बाधित होतना दिसून येत आहे.केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दानवे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.दोन दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं.

    केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ट्विट करत म्हणाले की ,”माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षण जाणवत असल्याने आपण टेस्ट केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार घेत आहे.स्वत: ला आयसोलेशन करुन घेतलं असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

    दरम्यान रयत क्रांती संघटनेचे नेते आणि विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी रावसाहेव दानवे यांनी लवकर बरे व्हावं, तसेच राज्यातील जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव आपल्या पाठिशी असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

    Union Minister of State for Railways Raosaheb Danve infected with corona

    Related posts

    Home and Car Loans : 62 लाख कर्जदारांना बसणार फटका? गृहकर्ज आणि वाहनकर्ज मिळवणे होणार कठीण; बँकांच्या नव्या नियमांची तयारी

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    कबड्डी प्लेयर वगैरे ठीक आहे, पण छगन भुजबळांना हवाय राष्ट्रवादीतल्या घराणेशाहीचा “न्याय”!!