महाविकास आघाडीची वज्रमूठ सांभाळत पाचोर्‍यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची स्वतंत्र वज्रमूठ!!, अजितदादांच्या मुख्यमंत्री पदावर टाळले बोलणे

प्रतिनिधी

पाचोरा : खानदेशातील पाचोर्‍याच्या शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटलांना घूस म्हणत टोले जरूर हाणले. पण त्याच वेळी महाविकास आघाडीची वज्रमूठ सांभाळत शिवसेनेची स्वतंत्र वज्रमूठ बांधायचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी त्यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाच्या उफाळलेल्या महत्त्वाकांक्षेवर बोलणे खुबीने टाळले. Uddhav Thackeray tried to balance between MVA and Shivsena in pachora

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर मध्ये झालेल्या दोन वज्रमूठ सभांमधील विषयांपेक्षा वेगळे कोणतेही विषय उद्धव ठाकरेंच्या आजच्या पाचोर्‍याच्या सभेत नव्हते. बाकी गद्दार, खोके या शब्दांची रेलचेल होती. शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी घूस हा नवा शब्द बहाल केला.

नागपुरातली वज्रमूठ सभा झाल्यानंतर शिवसेनेची स्वतंत्र सभा पाचोऱ्यात झाली. दरम्यानच्या काळात अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा उफाळून आली. त्यावर गेले 2 – 3 दिवस महाराष्ट्रात राजकीय घमासान सुरू आहे. सुरुवातीला संजय राऊत यांनी अजितदादांशी पंगा भेट त्यांच्यावर आक्रमण केले खरे, पण काल आणि आज त्यांनी तलवार म्यान केली.

https://youtu.be/RbMVSDA_6s0

उद्धव ठाकरे यांनी देखील आजच्या सभेत महाविकास आघाडी आणि शिवसेना यांच्यात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आजच्या सभेत महाविकास आघाडीतल्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेवर बोलणे खुबीने टाळले. त्यांनी आपला सर्व टीकेचा रोख गुलाबराव पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रातील मोदी सरकार यावर ठेवला. सत्यपाल मलिकांचा उल्लेख करून त्यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केंद्र सरकारला त्यांच्यासारखेच दोषी धरले आणि आजच्या सभेचा संपूर्ण भर महाविकास आघाडीपेक्षा शिवसेनेची स्वतंत्र वज्रमूठ बांधण्याच्या दिशेनेच प्रयत्न करण्यावर ठेवला.

Uddhav Thackeray tried to balance between MVA and Shivsena in pachora

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात