२५ वर्षे युतीत सडले म्हणणारे अडीच वर्षांत पवारांबरोबर जाऊन संपले; फडणवीसांचे शरसंधान

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : आम्ही 2019 मध्ये शिवसेनेसोबत युती करून लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढलो, पण निकाल लागल्यावर त्यांना सत्तेची खुर्ची दिसली आणि त्यांनी भाजपाची २५ वर्षांची युती तोडली आणि दोन्ही काँग्रेससोबत सरकार स्थापन केली. २५ वर्षे युतीत सडलो म्हणाले. पण पवारांबरोबर जाऊन अडीच वर्षांत संपले. Those who say 25 years rotten in alliance ended up with Pawar in two and a half years

असंगाशी संग केल्यावर काय होते, हे तुम्ही पाहताच आहात, अशा तिखट शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शहर सिद्धांत साधले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 12 विधानसभा आणि 2 लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या शक्ती केंद्र, बूथ कार्यकर्त्यांच्या विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे या मेळाव्यात मुख्य भाषण झाले.

बेईमान पुन्हा उभे राहणार नाहीत

निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आपण सोडवला, असे म्हटले. त्यामुळे खऱ्या अर्थाने शिवसेना सुरक्षित झाली, आपल्याशी ज्यांनी बेईमानी केली त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम आम्ही 6 महिन्यांआधी केले. त्यांची अशी अवस्था केली की ते पुन्हा उठून उभे राहण्याची सोय राहिली नाही.


पहाटेच्या शपथविधीच्या गौप्यस्फोटानंतर शरद पवार म्हणतात, मला देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व वाढवायचे नाही!!


लबाडा घरचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरे नाही, अशी म्हण मागील सरकारने केलेल्या घोषणावरून दिसून येते, अडीच वर्षे महाराष्ट्रात एकही योजना झाली नाही, आता अडीच वर्षात पाच वर्षांचे काम करायचे आहे, ट्वेन्टी ट्वेन्टीची मॅच खेळायची आहे. म्हणूनच महाविजय, महासंपर्क यात्रा हाती घेतली आहे. पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवायची आहेत. युवा वॉरियर तयार करायचे आहेत. लोकसभेत यश मिळाले, पण विधानसभेत योग्य ते यश कोल्हापुरात मिळाले नव्हते, आता दोन्हीमध्ये १०० % यश मिळवायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Those who say 25 years rotten in alliance ended up with Pawar in two and a half years

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात