प्रतिनिधी
मुंबई : ज्यांना फटाक्यांचा आवाज होतोय त्यांनी…., मनसेने कडक शब्दात सुनावले आहे!! कोरोना मुक्त वातावरणात दिवाळी सुरू असल्याने सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी सुरू असते, विशेषतः सोमवारी, २४ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्साह दिसला. रात्रीपर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरू होती, अशा वेळी मात्र काही मुसलमानांना ही डोकेदुखी वाटत होती. त्यांनी याविरोधात चक्क पोलिसांकडे तक्रार केली. त्यावर मनसेने कडक शब्दांत त्या मुसलमानांना सुनावले. ‘तुमची भोंग्यावरील अजान आजही सुरू आहे’, याची आठवण करून दिली. Those who are hearing the sound of firecrackers…, MNS has given a stern word
ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबईच काय, देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच.आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा, अशा शब्दात अमेय खोपकरांनी ट्विट केले आहे.
काय आहे प्रकरण?
ट्विटरला एका मुस्लीम व्यक्तीने पोलिसांना टॅग करत रात्रीच्या वेळी फटाके वाजत असल्याची तक्रार केली होती. सलमान खान नावाच्या व्यक्तीने रात्रीचे दोन वाजले तरी कांदिवलीतील गणेश नगर येथे फटाके वाजवले जात असल्याचे ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यावर मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी याचा ट्विटरवरूनच समाचार घेतला. मनोज चव्हाण यांनी या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर करून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होत आहे. आम्ही रोज फटाके फोडत नाही, मात्र तुमची अजान अजूनही अनेक ठिकाणी भोंग्यावर सुरू आहे. थोडं सहन करा कारण दिवाळी आहे, असे ते म्हणाले.
काय म्हणतात मनोज चव्हाण?
‘ट्विट पाहून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. देवाच्या नावाखाली वर्षानुवर्ष आम्ही यांचे अजान ऐकत आहोत, आम्ही ते सहन करतोय ना. दिवाळी तर फक्त चार दिवस असते. काल पहिला दिवस असल्याने पहाटे लोक उठणारच. त्यांना इतका त्रास होत असेल तर त्यांच्या अजानचा आम्हाला किती त्रास होतो हे पाहिलं पाहिजे. माझा विषयच हा होता की, जसे हे सगळे एकत्र येतात आणि पोलिसांना ट्विट करणे वैगेरे गोष्टी करतात. तशाच प्रकारे हिंदूही एकवटणे गरजेचे आहे. आपण एकवटलो तरच प्रत्युत्तर देता येईल, असे चव्हाण म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App