विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोविडच्या पार्श्व भूमीवर यंदाही दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. This year also no dahihandi in Mumbai due to corona
टास्क फोर्सच्या प्रस्तावानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनीही समन्वय समितीला उत्सव साजरा न करण्याची मागणी केली. त्यामुळे समन्वय समितीनेही उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
समन्वय समितीमार्फत यंदा फक्त विभागात दहीहंडी उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे. कोविड प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेले गोविंदा पथकात सहभागी असतील. लहान मुलांचा सहभाग नसेल, अशी विनंती केली; मात्र दहीहंडी उत्सव साजरा केल्यास सामाजिक अंतर राखणे तसेच इतर नियम पाळणे शक्यब नाही. तसेच कोविडचा धोका अद्याप संपलेला नाही. तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. त्या पार्श्वतभूमीवर यंदा उत्सव साजरा करू नये, असा प्रस्ताव टास्क फोर्सकडून मांडण्यात आला.
कोविडमुळे गेल्या वर्षीही दहीहंडी उत्सव साजरा झाला नव्हता. यंदा ३० ऑगस्टला दहीहंडी आहे. त्या पार्श्वलभूमीवर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समन्वय समितीची बैठक झाली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, आयोजक आणि कोविड टास्क फोर्सचे सदस्य होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App