‘’ही सत्याग्रह यात्रा नाही, काँग्रेसची पश्चाताप यात्रा आहे’’ भाजपाने लगावाला टोला!

Keshav Uppadhye and congress

ठाणे काँग्रेसकडून राहुल गांधींना घरचा आहेर; सत्याग्रह यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्रही वापरले जाणार असल्याचे केले जाहीर.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना आता ठाणे काँग्रेसने चांगलाच दणका दिल्याच दिसत आहे. कारण, एकीकडे वर्षानुवर्षे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा माफीवीर असा उल्लेख करत, अवमानकारक टीका टिप्पणी करणाऱ्या राहुल गांधींच्या सावरकर द्वेषाला न जुमानता ठाणे काँग्रेसने सत्याग्रह यात्रेत वीर सावरकरांचे छायाचित्र वापरणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा एकप्रकारे राहुल गांधींसाठी ठाणे काँग्रेसकडून घरचा आहेरच म्हणावा लागणार आहे. यावरून आता भाजपाने काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. This is not a Satyagraha Yatra it is a regret yatra of the Congress BJP target

‘’भाजपाच्या सावरकर यात्रेनंतर आता काँग्रेसने त्यांच्या सत्याग्रह यात्रेत सावरकरांच्या छायाचित्राला स्थान देण्याचं ठरवलं आहे. मै सावकर हू क्या माफी मांगणे के लिए, अशी दर्पोक्तीयुक्त उद्गार काढणाऱ्या राहुल गांधींच्या गर्विष्ठ विधानापासून, आता महाराष्ट्रील सत्याग्रह यात्रेत सावरकरांचं छायाचित्र आणणं, ही काँग्रेसला सुचलेली पश्चात बुद्धी आहे. ही सत्याग्रह यात्र नाही तर ही पश्चाताप यात्रा आहे, हेच खरं.’’ असं भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

https://youtube.com/shorts/bTSv8eK3zWA?feature=share

भारत जोडो यात्रा आणि हात जोडो यात्रांपाठोपाठ आता जय भारत सत्याग्रह हा कार्यक्रम करण्याचा निर्णय अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने घेतला असून या यात्रेची सुरुवात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून होणार आहे. शिवाय, महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या विस्तारित कार्यकारणीची बैठक पहिल्यांदाच ठाण्यात होणार आहे. येत्या १० एप्रिलला ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,  अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वच स्वातंत्र्यवीरांचा सन्मान म्हणून त्यांची छायाचित्र यात्रेत वापरली जणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

This is not a Satyagraha Yatra it is a regret yatra of the Congress BJP target

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात