हे कॉंग्रेसचे लोक मेले होते, उध्दव ठाकरेंनी सरकारमध्ये घेतले म्हणनू मेलेले लोक जीवंत झाले, कुत्र विचारायला तयार नव्हते, शिवसेना समर्थम आमदाराचा घरचा आहेर


हे काँग्रेसचे लोक. मेले होते तुम्ही, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं म्हणून हे मेलेलं लोक जिवंत झाले. नाहीतर यांच्या दोन्ही पक्षांमध्ये अशी गळती लागली होती की कुत्रं विचारायला तयार नव्हते. सर्व सुटकेस बांधून दुसºया पक्षात जायला तयार होते. हे सर्व मेलेले लोक जिवंत झालेले आहेत हे मी उघडपणे सांगतो, असा घरचा आहेर शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी दिला आहे.These Congress people were dead, Uddhav Thackeray took over the government, so the dead people came alive, Shiv Sena Samartham MLA’s home


विशेष प्रतिनिधी

नागपूर : हे काँग्रेसचे लोक. मेले होते तुम्ही, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं म्हणून हे मेलेलं लोक जिवंत झाले. नाहीतर यांच्या दोन्ही पक्षांमध्ये अशी गळती लागली होती की कुत्रं विचारायला तयार नव्हते. सर्व सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात जायला तयार होते.

हे सर्व मेलेले लोक जिवंत झालेले आहेत हे मी उघडपणे सांगतो, असा घरचा आहेर शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी दिला आहे.
आशीष जयस्वाल हे रामटेक- नागपूर येथील शिवसेना समर्थक आमदार आहेत. २०१९ मध्ये रामटेक मतदारसंघात अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आशीष जयस्वाल यांनी हे वक्तव्य केले आहे.

जिल्ह्य़ाच्या ग्रामीण राजकारणावरील काँग्रेस-राष्ट्रवादीची पारंपरिक पकड मोडीत काढत भाजपाने १२ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेवर शिवसेनेच्या मदतीने भगवा फडकावला होता. पाच वर्षे पक्ष राज्यात सत्तेत असल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्याचा धडाका तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला होता. मात्र आॅक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपाला नाकारले. सहापैकी फक्त दोन जागा भाजपाला मिळाल्या. त्यापैकी एक जागा तर निसटत्या मताने जिंकली. २०१४ मध्ये त्यांच्याकडे पाच जागा होत्या. त्यानंतर २०१९ पासून काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचा एक असे आघाडीचे तीन आमदार आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार आशीष जयस्वाल यांनी महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेस पक्षांना डिवचलं आहे. त्यामुळे आशीष जयस्वाल यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

These Congress people were dead, Uddhav Thackeray took over the government, so the dead people came alive, Shiv Sena Samartham MLA’s home

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात