शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचे काम निकृष्ट राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महापालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचा एक तुकडा खाली पडल्याचे आढळले. यामुळे महापालिकेच्या गलथान कारभारावर शिक्कामोर्तब झाले आहे,अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख यांनी केली. The work of Meghadambari of the statue of Lord Shiva is inferior, NCP claims

ते म्हणाले की, “मोठा गाजावाजा करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिका परिसरात पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करुन घेतले. परंतु, मेघडंबरीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले असून उद्घाटनाचा अजून मंडपही हटला नसताना मेघडंबरीचा तुकडा खाली पडला आहे.”



देशमुख म्हणाले की, “भाजपाने अतिशय घाईघाईने शिवरायांच्या पुतळ्याचे काम केले असून केवळ मोदींच्या पुढे चमकोगिरी करण्यासाठी दर्जेदार काम करुन घेतले नाही, हेच यातून सिद्ध झाले आहे. कामाची तातडीने चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात पण त्यांना शिवरायांबाबत किंचितही आपुलकी नाही”

The work of Meghadambari of the statue of Lord Shiva is inferior, NCP claims

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात