• Download App
    अरबी समुद्रातील रखडलेले शिवस्मारक हे संपलेले स्वप्न; पुरुषोत्तम खेडेकरांचे टीकास्त्र; सिंदखेड राजा जवळ आंतरराष्ट्रीय स्मारकाची मागणी!! The Shiva Memorial in the Arabian Sea is a dream come true

    अरबी समुद्रातील रखडलेले शिवस्मारक हे संपलेले स्वप्न; पुरुषोत्तम खेडेकरांचे टीकास्त्र; सिंदखेड राजा जवळ आंतरराष्ट्रीय स्मारकाची मागणी!!

    प्रतिनिधी

    बुलढाणा : अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु आता हे स्मारक रखडले असल्याने हे स्वप्न संपल्यात जमा आहे, असे टीकास्त्र मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी सोडले आहे.The Shiva Memorial in the Arabian Sea is a dream come true

    अरबी समुद्रात शिवस्मारक ऊभे करण्याऐवजी आता महाराष्ट्राच्या सरकारने माता जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा जवळ मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर 200 – 300 एकर जमीन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बांधावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

    त्याचबरोबर विविध शहरे, गावांमध्ये अनधिकृत जागांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारणे थांबवले पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.

    अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजन आणि जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्यासंदर्भात काही प्रयत्न केले. पर्यावरण विषयक परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, नंतर मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मध्ये काम रखडले गेले. गेल्या अडीच वर्षांमध्ये अरबी समुद्रातील शिवस्मारक याबाबत कोणतीही प्रगती झाली नाही. या पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम खेडेकर यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारक हे संपलेले स्वप्न आहे, असे वक्तव्य केले आहे.

    The Shiva Memorial in the Arabian Sea is a dream come true

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!