शिंदे – फडणवीस सरकारने महाराष्ट्रातल्या बारचालकांना केले नाराज; बार मधली दारू केली महाग!!

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात भाजपच्या राज्यात दारू महाग केल्याने बारचालक नाराज झाले आहेत.शिंदे – फडणवीस राज्य सरकारने परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये 5 % वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बारचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आत्ताच्या सरकार पेक्षा जुने ठाकरे – पवार सरकारच चांगले असल्याचे बारचालकांनी म्हटले आहे.The Shinde-Fadnavis government upset the bar owners of Maharashtra; Alcohol in the bar is expensive!!

शिंदे – फडणवीस सरकारने शुक्रवारी बारमधील दारूवर 5 % व्हॅट वाढविला. त्यामुळे बारमधील दारू महाग होणार असली, तरी स्टार हॉटेल्समधील दारूच्या दरावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण तेथील व्हॅट आधीपासूनच 20 % इतका आहे.



बारचालक नाराज

सरकारने बारमधल्या दारूवर 5 % व्हॅट वाढविल्यानंतर बारचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने आधीच अबकारी परवाना शुल्क वाढवल्याने व्यावसायावर ताण आलेला असताना आता व्हॅटमध्ये 5 % वाढ करण्यात आल्याने दारू दर महाग झाल्याने व्यवसायावर परिणाम होणार आहे, असे बारचालकांचे म्हणणे आहे. एकीकडे पर्यटन आणि महसूलवाढीसाठी सर्व राज्यांमध्ये स्पर्धा सुरू असताना महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतल्याने आपल्या उद्दिष्टांना धक्का पोहोचणार असल्याचा दावा बारचालकांनी केला आहे.

बारमधील दारूवर 5 % व्हॅट वाढविण्याचा सरकारचा निर्णय अनपेक्षित आहे. आधीच अबकारी परवाना शुल्कात वाढ करण्यात आलेली असताना आता व्हॅटमध्येही वाढ झाल्याने रेस्टॉरंट आणि बारमध्ये मद्याचे दर वाढतील. महाराष्ट्राशी इतर राज्ये स्पर्धा करत आहेत, अर्थव्यवस्था चालवण्यामध्ये पर्यटनाची शक्ती ओळखून उत्पादन शुल्क कमी केले जात आहे. गोवा, चंदीगड आणि हरियाणा ही अशी काही उदाहरणे आहेत, असे पश्चिम भारत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट संघटनेचे प्रमुख प्रदीप शेट्टी यांनी सांगितले.

सरकारच्या या निर्णयाचा रेस्टॉरंटवर मोठा परिणाम होणार असून यामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारावरही विपरीत परिणाम होईल, असे आहार संघटनेचे प्रमुख सुकेश शेट्टी यांनी म्हटले आहे.

The Shinde-Fadnavis government upset the bar owners of Maharashtra; Alcohol in the bar is expensive!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात