विशेष प्रतिनिधी
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पुन्हा एकदा घसरली आहे. इगतपुरी मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना नानांनी, “ज्याची बायको पळते त्याचे नाव मोदी ठरते”, अशा शब्दात मोदींवर टीका केली आहे. The one whose wife runs away is named Modi; Nana’s tongue slipped again !!
मी मोदीला मारू शकतो. शिव्या देऊ शकतो, असे विधान केल्यानंतर नाना पटोले अडचणीत आले होते. आपण पंतप्रधान मोदींबद्दल नव्हे, तर गावगुंड मोदी बद्दल मी बोलत होतो, अशी सारवासारव त्यांनी केली होती. परंतु प्रत्यक्षात असा कोणताही गावगुंड आढळला नाही नाही त्यानंतर नानांवर चहूबाजूंनी टीकेची बरसात झाली होती.
तरी नाना बदलेले दिसत नाहीत. नानांनी काल इगतपुरी मध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात पुन्हा गावगुंड मोदीचा उल्लेख करताना “ज्याची बायको पळते त्याचे नाव मोदी ठरते”, अशा शब्दात टीका केली.
त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांनी नानांवर दारांवर टीकास्त्र सोडले आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष सारखे बोलत नसून एखाद्या गुंडा सारखी भाषा बोलत आहेत, असे ते म्हणाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App