विशेष प्रतिनिधी
मुंबई : गुजराती उद्योगपतीच्या मध्यस्थीने दोन राष्ट्रवादींचे विलीनीकरण, सत्ताधारी भाजप प्रणित NDA आघाडीला पाठिंबा देण्याची ठेवली अट, असा शब्दांमध्ये काँग्रेसचे विदर्भातले नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची पोलखोल केली.
राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष कोणीही पटेल नको, पाटील हवा, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी केली होती. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोन नेते अडथळा आणत आहेत, असा आरोप शरद पवारांच्या गटातल्या नेत्यांनी केला. यातून या सगळ्यांनी गुजराती नेत्यांविरुद्ध आगपाखड केली.
– अदानी – पवार भेट
पण प्रत्यक्षात गौतम अदानी यांनी काल मुंबईत सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली त्यांच्याशी 45 मिनिटे चर्चा केली त्यानंतर आज शरद पवारांनी आपला दिल्ली दौरा रद्द करून बारामतीकडे कूच केले. त्यामुळे आता बारामती पुन्हा चर्चेत आली. शरद पवार बारामती येऊन मोठ्या घडामोडी घडवणार आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाला चालना मिळणार, अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या.
– वडेट्टीवारांनी केले expose
या पार्श्वभूमीवरच विजय वडेट्टीवार यांनी थेट नाव घेऊनच गुजराती उद्योगपतीच्या मध्यस्थीने दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार यासाठी सत्ताधारी भाजप प्रणित NDA आघाडीला पाठिंबा देण्याची अट शरद पवारांना पाळावी लागणार, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपदी कोणीही पटेल नको, पाटीलच हवा, असे म्हणणाऱ्यांना आणि प्रफुल पटेलांवर ठपका ठेवणाऱ्यांना विजय वडेट्टीवार यांनी expose केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App