खळबळजनक : MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुणीचा राजगडाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह!

तरुणीच्या मित्रानेच खून केला असल्याचा पोलिसांना संशय, घटनेनंतर फरार झालेल्या मित्राचा शोध सुरू

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांक पटकावत उत्तीर्ण होत वन परिक्षेत्र अधिकारी पद मिळवणाऱ्या दर्शना पवार(वय-२६) या तरुणीचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी मृतदेह आढळल्याने, एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणीचे वडील दत्तात्रय दिनकर पवार यांनी तक्रार दिली आहे. The dead body of a girl who passed the MPSC exam was found at  the Rajgad

दर्शना पवार हिचा खून झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. दर्शना आणि तिचा मित्र राजगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. या घटनेनंतर दर्शनाचा मित्र पसार झाला असून त्यानेच तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुण्यातील एका संस्थेकडून दर्शनाच्या सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्यासाठी ती ९ जून रोजी पुण्यात आली होती आणि मैत्रिणीकडे थांबली होती. दरम्यान १२ जून रोजी सिंहगड किल्ल्यावर निघाली आहे, असे सांगून ती घराबाहेर पडली, तेव्हा तिच्यासोबत राहुल हांडोरे  हा तिचा मित्र होता. त्यानंतर तिचा  फोन बंद येऊ लागल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला होता व दर्शना बेपत्ता असल्याची तक्रारही पोलिसात दिली होती.

The dead body of a girl who passed the MPSC exam was found at  the Rajgad

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात