नारायण राणेंचे टीकास्त्र : सेनेला अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत आणि चाललेत बंडखोरांची प्रेतं आणायला!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असताना शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे बंडखोर आमदारांसह गुवाहटीमध्ये ठाण मांडून आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेनेविरोधात एकनाथ शिंदे गटाने बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. अशातच भाजप नेते नारायण राणे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. The army can’t kill the mosquitoes on its body and is trying to bring the corpses of the rebels on the move.राणेंचे ट्विट

नारायण राणे यांनी ट्विट करून म्हटले की, शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणं बंद करावं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, ‘गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील’, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल? अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का? असा सवाल त्यांनी केला.

एअरपोर्टवरून उतरले की विधानभवनात जाणारा रस्ता हा वरळीतून जातो. या सर्व बंडखोर आमदारांना विधान भवनाची पायरी चढू देणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावरच प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले, शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा आहे. युवराजांनी धमक्या देणं बंद करा, अंगावरचं मच्छर मारता येत नाहीत, असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना गुवाहाटीतून ४० आमदारांचे मृतदेह मुंबईत येतील व त्यांचे शवविच्छेदन होईल, असे विधान केले होते. त्यावर गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील, अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल, अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का, असा सवाल देखील राणेंनी उपस्थित केला आहे.

The army can’t kill the mosquitoes on its body and is trying to bring the corpses of the rebels on the move.

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात