ईडीच्या नोटिशी संदर्भात सिंदखेड राजामध्ये भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांची साक्ष काढली. कमला हॅरीस यांनी कोणत्याही देशात लोकशाही कोणतीही किंमत चुकवून टिकली पाहिजे, असे वक्तव्य केले आहे.Supriyatai says ED’s notice is fashion and postcard; So why are Deshmukh and Mushrif afraid of her ??
विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रातल्या भाजप सरकार विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तींना आणि नेत्यांना सक्तवसुली संचालनालय ईडी कायम नोटीस पाठवायला लागली आहे. ती आता फॅशनच झाली आहे. ईडीची नोटीस एखाद्या पोस्टकार्ड सारखी येते, अशा शब्दात बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारची आणि भाजपची खिल्ली उडवली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचे हे वक्तव्य खरे मानले तर मग ईडीच्या फॅशनला आणि पोस्टकार्डाला ठाकरे – पवार सरकारमधून राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांना ईडीच्या नोटीसा येऊनही ते ईडीच्या चौकशीला सामोरे जायला का घाबरत आहेत? ईडीची नोटीस ही फक्त साध्या पोस्ट कार्ड सारखी करण्यासारखे असेल तर त्यात घाबरण्यासारखे एवढे काय आहे? ईडीच्या नोटीसा हे दोन नेते पोस्टकार्डसारख्या फाडून फेकून का देत नाहीत? हे प्रश्न आता सोशल मीडियावर चर्चिले जाऊ लागला आहेत.
ईडीच्या नोटिशी संदर्भात सिंदखेड राजामध्ये भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरीस यांची साक्ष काढली. कमला हॅरीस यांनी कोणत्याही देशात लोकशाही कोणतीही किंमत चुकवून टिकली पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्याला माझा पाठिंबा आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पण मग ईडीच्या चौकशीला सामोरे जाऊन ईडीला खोटे पाडण्याची खोटे पाडण्याचा लोकशाही अधिकार अनिल देशमुख आणि हसन मुश्रीफ का बजावत नाहीत? हा प्रश्न सुप्रिया सुळे यांना कोणी विचारला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App