विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे से बैर नही देवेंद्र तेरी खैर नही, असे म्हणणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी परखड शब्दांत प्रत्युत्तर दिले. Supriya sule targets devendra fadnavis
शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे या लहानपणीपासून त्यांच्याकडूनच हे सगळं शिकल्या. लिंबाच्या झाडापासून तुम्ही गोड फळांची अपेक्षा करुच नका. जसा बाप तशीच लेक असे म्हणत पडळकरांनी शरद पवारांसह सुप्रिया सुळेंवर जोरदार निशाणा साधला.
सुप्रिया सुळे “किडकी बहिण”
सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्याबद्दल सहानुभूती दाखवू नका असे बोलतात. अजित पवार तिकडं लाडकी बहिण योजनेसाठी राज्यभरात फिरत आहेत, पण इथं सुप्रिया सुळे त्यांच्यातली “किडकी बहीण” महाराष्ट्राला दाखवत असल्याचे पडळकर म्हणाले.
मनोज जरांगे, एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे तिघेही मराठा आहेत, म्हणून जरांगे आणि शिंदेंबद्दल बोलायच नाही, असे सुप्रिया सुळे बोलल्या असल्याचे पडळकर म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आता यात वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे. कारण, मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन इथे महायुतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पडळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
Solution Provider : पंतप्रधान मोदींच्या यशस्वी परराष्ट्र धोरणामुळे आज भारत जगात ‘सोल्युशन प्रोव्हायडर’च्या भूमिकेत
फडणवीस केवळ ब्राह्मण म्हणून लक्ष्य
जरांगे-शिंदे यांच्याशी वैर नाही, पण देवेंद्र तुझी खैर नाही!” असे संदेश देणारे लोक देवेंद्र फडणवीस साहेबांना केवळ ब्राह्मण आहेत म्हणून लक्ष्य करत असल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. महाराष्ट्राला जातीयतेच्या आगीत झोकणारे शरद पवार पुरोगामी मुखवटा घालून जातीवादाचे विष महाराष्ट्रात पसरवत असल्याची टीका पडळकर यांनी यावेळी केली. फडणवीस यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचे पडळकर म्हणाले. पवारांचा एक फॉर्म्युला आहे. पुरोगामीपणाच्या बाता मारायच्या आणि जातीयवादावर चर्चा घडवायच्या असे पडळकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस तुम्हाला पुरुन उरले आहेत. ते कशातच सापडत नाहीत म्हणून त्यांच्या जातीवर बोलायचे असेही पडळकर म्हणाले. लहानपणापासून सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्याकडून शिकल्या आहेत. शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ असल्याचे पडळकर यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन महाराष्ट्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण केलं जात असल्याचेही गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत हस्तक्षेप करावा, असेही पडळकर म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App