Supriya Sule : नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाही; सुप्रिया सुळेंचे प्रशांत जगपात यांना खडेबोल

Supriya Sule

विशेष प्रतिनिधी

पुणे : Supriya Sule पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची युती होण्याची शक्यता आहे. पण शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाही, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर जगपात काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.Supriya Sule

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने नुकतेच तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर प्रशांत जगताप यांनी हे वृत्त जोरकसपणे फेटाळून लावले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा झाली तर माझा राजीनामा तयार आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी त्यांना वरील खडेबोल सुनावलेत.Supriya Sule



काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, प्रशांत जगताप यांनी उपस्थित केलेले प्रश्न रास्त आहेत. पण सगळ्या कार्यकर्त्यांचे मत महत्त्वाचे आहे. ही निवडणूक आहे. अशी नाराजी घरी चालते. नाराजी लोकशाहीत मान्य नाही. अशी नाराजी पक्षात चालत नाही. समाजात काम करताना नाराजी चालत नाही. ममी येथे पक्षाच्या बैठकीला आले आहे. गत अनेक दिवस संसदेचे अधिवेशन सुरू होते. त्यात अनेक विधेयके सादर करण्यात आली. मी अतिशय महत्त्वाच्या वेळी दिल्लीत होते. आज महापालिका निवडणुकीविषयी काय निर्णय घ्यायचा याचा आढावा घेतला जाईल.

महाविकास आघाडी पुण्याच्या विकासासाठी लढणार आहे. त्यात समविचारी पक्ष आले तर त्यांचे स्वागतच आहे. निवडणुका येतील व जातील. पण प्रदुषणाचे काय? सत्ताधाऱ्यांनी 24 तास पाणी पुरवठा करण्याची ग्वाही दिली होती. पण आज आमच्या बिल्डिंगमध्ये टँकर येतो. अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. मी तूतू, मी मी करत बसणार नाही. पुण्यात चांगला बदल हवा असेल तर सर्वांना एकत्र यावे लागेल. या प्रकरणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule Reprimands Prashant Jagtap NCP Alliance VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात