नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात बरोबर “पवार संस्कारितांचे” कारनामे; पण सुप्रिया सुळे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस तर दाभोळकरांचा वारसा सांभाळणारे!!, असला प्रकार आज समोर आला. Supriya Sule
भोंदू बाबा अशोक खरात याच्या सगळा पोलखोल आणि पंचनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांनीच पोलिसांना सर्व प्रकारची कारवाई करण्याची मुभा दिली म्हणून तर अशोक खरात याच्या सगळ्या भोंदूगिरीचा पर्दाफाश झाला. जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि पोलीस खात्याने अशोक खरातच्या मुसक्या आवळल्या नव्हत्या, तोपर्यंत सगळे विरोधक गाढ झोपेत होते. त्यांना अशोक खरात प्रकरणाची साधी भनक सुद्धा नव्हती. उलट राज्यातले मंत्री संत्री आणि “पवार संस्कारित” नेते अशोक खरातच्या नादी लागून वाटेल तसे टोटके करत होते. कुणी करंगळी कापून अभिषेक करत होते, तर कोणी रक्ताची आंघोळ करत होते.Supriya Sule
बोलक्या पोपटांमध्ये सुप्रिया सुळे यांची भर
पण देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राच्या पोलिसांनी अशोक खरातचे सगळे कारनामे बाहेर काढले. त्यानंतर विरोधकांमधले सगळे पोपट बोलायला लागले. त्याच पोपटांमध्ये आज सुप्रिया सुळे यांची भर पडली. त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. अशोक खरातच्या मुसक्या आवळून देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र दाभोळकरांचाच वारसा पुढे चालविला असल्याची मखलाशी सुप्रिया सुळे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केली. बाकी सातारा जिल्हा परिषदेत लोकशाहीची हत्या झाली वगैरे बाता सुद्धा त्यांनी मारल्या. देवेंद्र फडणवीस यांना नरेंद्र दाभोळकरांचा वारस ठरवून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच बौद्धिक दृष्ट्या “धोक्यात” आणले. पण या सगळ्या प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्यापासून ते जयंत पाटलांपर्यंत सगळे पवार संस्कारितच कसे अडकले हा सवाल त्यांना कोणी केला नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना त्या सवालाचे उत्तर द्यावे लागले नाही. पण म्हणून पवार संस्कारित लोकांची दांभिकता लपली नाही.
जयंत पाटलांनी रक्ताची आंघोळ केल्याचा आरोप
सुप्रिया सुळे यांच्या पलीकडे जाऊन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या विरुद्ध शरसंधान साधले. जयंत पाटलांनी अशोक खरातला ईश्वरपूर मध्ये आणले होते. त्याआधी त्यांनी अशोक खरात कडे जाऊन रक्ताची आंघोळ केली होती. त्यामुळे जयंत पाटलांना सुद्धा सह आरोपी करून खटला चालवला पाहिजे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. गोपीचंद पडळकर यांच्या आरोपांमुळे अशोक खरातचे प्रकरण जयंत पाटलांपर्यंत जाऊन थटले. एरवी जयंत पाटलांनी सुद्धा तोंडी पुरोगामी भाषा वापरून ती गुळगुळीत करून ठेवलीच होती. पण आता त्यांच्यावरच थेट रक्ताची आंघोळ केल्याचा आरोप झाल्यामुळे “पवार संस्कारित” सुद्धा कसे जादूटोण्याच्या मागे लागले होते, हेच वास्तव महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले.
लाईव्ह |📍दिल्ली |पत्रकारांशी संवाद| 🗓️24-03-2026 https://t.co/r0w82LKK3U — Supriya Sule (@supriya_sule) March 24, 2026
लाईव्ह |📍दिल्ली |पत्रकारांशी संवाद| 🗓️24-03-2026 https://t.co/r0w82LKK3U
— Supriya Sule (@supriya_sule) March 24, 2026
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App