प्रतिनिधी
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या अजित पवारांमुळे निवडून येतात अजित पवार तन-मन-धनाने काम करतात म्हणून सुप्रिया सुळे यांना मते मिळतात, असे वक्तव्य अजितनिष्ठ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले मिटकरी यांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळेंनी आज प्रत्युत्तर दिले. Supriya Sule flinched at the word money in Amol Mitkaris statement
तत्पूर्वी मिटकरींचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी शांतपणे ऐकला. अजित पवारांनी तन – मन – धनाने सुप्रिया सुळेंना मदत केल्याचे ऐकताच त्यातल्या “धन” या शब्दापुढे थबकल्या!!… नंतर त्यांनी पुढचा व्हिडिओ ऐकला. तो व्हिडिओ ऐकून त्यांनी अमोल मिटकरी यांना प्रत्युत्तर दिले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजितदादांनी नेहमीच तन आणि मनाने निवडणूक लढवली आणि मलाही तन मन यांनी मदत केली. पण धनाने कधीच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस – पवार कुटुंबीय यांनी कधीच धनाने निवडणूक लढवली नाही. अमोल मिटकरी यांचे मला माहिती नाही, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. त्यामुळे अमोल मिटकरींनी राष्ट्रवादी काँग्रेस – पवार कुटुंबीय आणि धन या गोष्टींची गल्लत करू नये. त्यांना याविषयी चुकीची माहिती आहे, असे उद्गार सुप्रिया सुळे यांनी काढले.
पण अमोल मिटकरी यांच्या व्हिडिओत “धन” हा शब्द ऐकताच सुप्रिया सुळे थबकल्या आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पगार कुटुंबीय आणि धन या गोष्टींची गल्लत करू नये, असा इशारा अमोल मिटकरी यांना दिला. त्यामुळे या इशाऱ्यातले “बिटवीन द लाईन्स” नेमके काय आहे??, याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
झाले ते झाले, पण यापुढे अमोल मिटकरी यांनी आपल्या पुढच्या भाषणांमधून पवार कुटुंब आणि धन हे शब्द एकमेकांना जोडू नयेथ. कारण त्यातून अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात अशी धास्ती वाटल्याने सुप्रिया सुळे यांनी अमोल मिटकरी यांना सूचक इशारा दिला आहे का??, अशीही चर्चा अनेक जण करत आहेत.
Supriya Sule flinched at the word money in Amol Mitkaris statement
महत्वाच्या बातम्या
- राघव चढ्ढा यांना न्यायालयाकडून झटका,”सरकारी घरावर ताबा ठेवण्याचा अधिकार नाही”
- Rajasthan : नितीश – लालूंच्या पावलावर अशोक गेहलोतांचे पाऊल; राजस्थानातही बिहारसारखे जातनिहाय सर्वेक्षण!!
- Asian Games : भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक जिंकल्यावर मोदींनी दिली खास प्रतिक्रिया, म्हणाले…
- देवरिया हत्याकांड प्रकरणी आणखी २३ अधिकाऱ्यांवर कारवाई; मुख्यमंत्री योगींची कडक कारवाई