प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या काल सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भात महाराष्ट्रात चर्चेचे वादळ उठले आहे. महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिल्ली पडलेली असताना 80 वर्षाचा तरुण योद्धा ती वज्रमूठ सावरण्यासाठी पुढे येत असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहे.Such a simple subject; Discussion with Uddhav Thackeray on daughter’s career and Tadoba; Disclosure of Supriya Sule
कालच्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या सामील झाल्या होत्या. या चर्चेचा त्यांनी वेगळा खुलासा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच्या चर्चेत मी उशिरा सहभागी झाले. माझी मुलगी इंग्लंडहून परत आली आहे. त्यामुळे तिच्या करिअर बाबत आणि ताडोबा अभयारण्या बाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सावरकर, अदानी, पंतप्रधानांची पदवी आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन या विषयांवर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी वेगवेगळ्या दिशांनी वक्तव्ये केल्यानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ ढिल्ली झाल्याचे दिसल्यानंतर ठाकरे – पवार चर्चा झाली. मात्र सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी मुलीचे करिअर आणि ताडोबा अभयारण्य या विषयांवर चर्चा झाल्याचा खुलासा केल्याने सिल्वर ओक मधली चर्चा एवढी साध्या आणि सोप्या मुद्द्यांवर झाली, या विषयी आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App