• Download App
    एसटी बसला सुरक्षा जाळ्यांचे कवच; संपात दगडांचा मारा रोखण्यासाठी उपाय|ST bus safety nets; Measures to prevent stoning

    WATCH : एसटी बसला सुरक्षा जाळ्यांचे कवच; संपात दगडांचा मारा रोखण्यासाठी उपाय

    विशेष प्रतिनिधी

    बीड : विविध आंदोलन काळात, तसेच एरव्ही माथेफिरूचे शिकार बनणाऱ्या एसटी बसचे दगड फेकीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान देखील होत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर बीड आगारात एसटीला संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम हाती घेतले आहे.ST bus safety nets; Measures to prevent stoning

    बीड विभागात संपकाळात आतापर्यंत तीन बसेसवर दगडफेक झाल्याने बसच्या काचा फुटून ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना काही कर्मचारी परतू लागल्याने,



    काही आगारांतून बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसच्या दिशेने येणारे दगड रोखण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रशासनाने तारेची संरक्षक जाळी बसविण्याचे काम हाती घेतले आहे.

    •  एसटी बसला सुरक्षा जाळ्यांचे कवच
    •  माथेफिरूच्या दगड फेकीतून वाचण्याचा प्रयत्न
    •  दगडफेकीमुळे होते काचेचे मोठे नुकसान
    • आतापर्यत बीडमध्ये ३ बसचे ४० हजारांचे नुकसान

    ST bus safety nets; Measures to prevent stoning

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा