विशेष प्रतिनिधी
पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या स्वागताच्या वेळी महापालिकेत दाखल झाले. पालिका भवनसमोरील भाजप कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांच्या अतिउत्सामुळे गोंधळ झाला.पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन गर्दीवर नियंत्रण मिळवले. पांगवली. यावेळी थोडी चेंगरा चेगरीही झाली. Somaiya re-elected; Chaos and police beatings
पुणे महापालिकेत सोमय्या यांना शिवसैनिकांकडून झालेल्या धक्काबुक्कीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात पुन्हा नवीन वादाला सुरवात झाली. या प्रकरणी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमय्या यांना जाणीवपूर्वक पालिकेत बोलावण्यात आले.
दरम्यान, महापालिकेत आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ‘त्याच’ पायरीवर जाऊन सत्कार करण्यास परवनगी नाकारली. शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत ते पायऱ्यांवरून पडले होते. मोठ्या प्रमाणातील पोलीस बंदोबस्त आणि पालिका भवनसमोरील भाजप पक्ष कार्यालया समोर मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते यामुळे एकच गोंधळ झाला. सोमय्या महापालिकेत मोठ्या गोंधळात दाखल झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App