माझी वसुंधरा मोहिम व कोरोना लसीकरणासाठी पुन्हा एकदा व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेण्यात येत आली आहे.Solapur: Will be called to work only after taking two doses of vaccine; Important information given by Dilip Swami
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : मागील दोन वर्षात कोरोनाने थैमान माजवलं होतं यावरून धडा घेत अनेक देशांनी खबरदारी म्हणून तातडीने काही नियमात बदल केले आहेत.दरम्यान कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगाला पुन्हा एकदा धडकी भरवली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोरोनाचे दोन लस टोचून घेतलेल्या कर्मचार्यांनाच यापुढे कामावर हजर करून घेण्यात येणार असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. यावेळी त्यांनी सांगितले की,माझी वसुंधरा मोहिम व कोरोना लसीकरणासाठी पुन्हा एकदा व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेण्यात येत आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ७०६ ग्रामपंचायतीमध्ये १ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता जनजागृती रॅली काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागास अधिक सतर्क राहण्याच्याही सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना लसीकरणासाठी घरोघरी व वाडी वस्तीवर मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरण न झालेल्या कुटुंबास शासकीय योजनेचा लाभ बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागास अधिक सतर्क राहण्याच्याही सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App