• Download App
    Sangh Centenary

    संघ शताब्दीनिमित्त शॉर्ट फिल्म आणि रील स्पर्धा महोत्सव; दीड लाखांची बक्षिसे; १५ जुलैपर्यंत अर्जाची मुदत

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील मिती फिल्म सोसायटीने पंचपरिवर्तन शॉर्ट फिल्म आणि रील स्पर्धेचे आणि महोत्सवाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी तब्बल दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे, स्मृतीचिन्हे आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मिलिंद लेले यांनी पत्रकार परिषदेत दिली. मितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. Sangh Centenary

    येत्या १५ आणि १६ ऑगस्ट २०२६ ला हा महोत्सव आणि स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार असून, समाजातील सर्जनशीलतेला वाव देणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रील आणि शॉर्ट फिल्म पाठवण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२६ पर्यंत आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी गुगल फॉर्मद्वारे आपली प्रवेशिका आणि रील किंवा शॉर्ट फिल्म पाठवायची आहे. नवनवीन विषय आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृतींसह जास्तीत जास्त तरुण आणि चित्रपटप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दीनिमित्त हाती घेतलेल्या सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, नागरी शिष्टाचार, स्व-बोध आणि पर्यावरण संरक्षण या पाच विषयांचा या स्पर्धेसाठी समावेश आहे.

    मितीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी यांनी या स्पर्धेचे नियम आणि अटींबाबत माहिती दिली. रील स्पर्धेला प्रवेश शुल्क १५० रुपये असून, रीलचा कालावधी जास्तीत जास्त ९० सेकंदांचा असावा. शॉर्ट फिल्मस्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ३०० रुपये असून, फिल्मचा कालावधी जास्तीत जास्त १० मिनिटांचा असावा.

    अर्जासाठी गुगल लिंक देण्यात आली असून त्यावर तपशील मागविण्यात आला आहे.
    https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfaGzDfyJQ_zfyM6KLojQlBfic0hO7Mi26-RHlGvZmuR8HdSg/viewform?usp=dialog
    संपर्कासाठी मोबाईल क्रमांक : ८१४९२११२९९

    Short Film and Reels Competition Festival marking the Sangh Centenary

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ममता बॅनर्जींची विरोधात बसल्यावर वजाबाकी; राष्ट्रवादीची सत्तेच्या खुर्चीवर बसूनही वजाबाकीच!!

    Manoj Jarange Patil : ‘काँग्रेसने तरी ओबीसींचे काय भले केले?’; वडेट्टीवारांवर जरांगेंचा पलटवार, धनंजय मुंडेंनाही दिला इशारा

    हे कसले सुरू झाले पार्थ पवार पर्व??; वजाबाकीतून पक्ष संघटनेची वाताहात झाली हेच खरे वर्म!!