कुचिक यांच्‍या मुलीकडून चित्रा वाघ, पिडीत मुलीची नार्को टेस्‍टची मागणी

शिवसेना नेते रघुनाथ कुचीक बलात्कार गुन्हा प्रकरणातसंबंधीत महिला आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्‍या संगणमताची चौकशी व्‍हावी व त्‍यांची नार्को चाचणी करावी अशी  तक्रार राज्‍य महिला आयोगाकडे कुचीक यांच्या मुलीने केली आहे. त्‍या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी करावी व चौकशी नंतरचा अहवाल माहिला आयोगाला पाठवावा असे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्‍याची माहिती राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.


प्रतिनिधी 

पुणे –पोलिसांचा आत्‍मविश्वास डळमळीत करण्यासाठी टिका केल्‍या जात आहेत. खोटे आरोप करण्या पेक्षा सत्‍यता पडताळून आरोप करावेत. शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणात दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल असे म्‍हणत राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नाव न घेता भाजप नेत्‍या चित्रा वाघ यांना टोला लगावला.कुचिक यांच्‍या मुलीकडून चित्रा वाघ, पिडीत मुलीच्‍या नार्को टेस्‍टची मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.Shivsena leader Raghunath kuchik daughter demanded Narko test of BJP leader Chitra wagh and Raped case girl

पुणे शहरातील अत्‍याचाराच्‍या घटनांचा पुणे पोलिसांचा विविध योजनांचा आढावा चाकणकर पुणे पोलिस आयुक्‍तालयाला भेट देऊन घेतला. यावेळी त्‍या बोलत होत्‍या. रघुनाथ कुचिक प्रकरणातील पिडीत मुलीचे अपहरण पोलिसांनी अपहरण केल्‍याचा आरोपावर चाकणकर म्‍हणाल्‍या, या संदर्भात पिडीत मुलीने शनिवारी रात्री दिड वाजता महिला आयोगाला तक्रार केली होती.



पुणे शहरातील अत्‍याचाराच्‍या घटनांचा पुणे पोलिसांचा विविध योजनांचा आढावा चाकणकर पुणे पोलिस आयुक्‍तालयाला भेट देऊन घेतला. यावेळी त्‍या बोलत होत्‍या. रघुनाथ कुचिक प्रकरणातील पिडीत मुलीचे अपहरण पोलिसांनी अपहरण केल्‍याचा आरोपावर चाकणकर म्‍हणाल्‍या, या संदर्भात पिडीत मुलीने शनिवारी रात्री दिड वाजता महिला आयोगाला तक्रार केली होती. परंत, रविवारी प्रशासकीय सुटी असल्‍याने कार्यालय बंद होते. त्‍यामुळ सोमवारी सकाळी ही तिचा इमेल आम्‍हाला मिळाला. तिने केलेल्‍या मागणीचा अर्ज पुणे पोलिसांना पाठविला आहे. तिने संपूर्ण मेडीकल तपासणीची मागणी केली आहे,

तिची तपासणी केली जावी यासाठी पोलिसांना सकाळी लवकरच पत्र पाठविले असल्‍याचे चाकणकर यांनी सांगितले.रघुनाथ कुचिक न्यायालयाच्‍या आदेशानुसार जामीनावर मुक्‍त आहेत, त्‍याचा तपास देखील सुरू आहे. असे असताना भाजप नेत्‍या चित्रा वाघ खोटी माहिती असंबधाने माध्यमांमध्ये पसरवित आहेत. कुचिक यांच्‍या विषयी अपमानजनक टिका करत आहेत.

यामुळे कुंटुंबियांच्‍या सामाजिक प्रतिष्ठेला धक्‍का पोहचला आहे. अशा पध्दतीने टिका होत असताना संबंधीत फिर्यादी आणि चित्रा वाघ ह्या संगणमताने प्रकरणाची मिडीया ट्रायल चालवत आहे. त्‍यामुळे संबंधीत महिला आणि चित्रा वाघ यांच्‍या संगणमताची चौकशी व्‍हावी व त्‍यांची नार्को चाचणी करावी अशी  तक्रार राज्‍य महिला आयोगाकडे केली आहे. त्‍या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी करावी व चौकशी नंतरचा अहवाल माहिला आयोगाला पाठवावा असे आदेश पोलिसांना देण्यात आले असल्‍याची माहिती चाकणकर यांनी दिली.

Shivsena leader Raghunath kuchik daughter demanded Narko test of BJP leader Chitra wagh and Raped case girl

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात