विशेष प्रतिनिधी
मुंबई : क्रुज ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या मूलभूत हक्कांची शिवसेनेला काळजी लागली आहे. शिवसेना नेते किशोर तिवारींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. Shiv Sena’s run in Supreme Court for Aryan Khan’s fundamental rights
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्याने आर्यन खानची देशभर चर्चा आहे. या प्रकरणाला राजकीय रंग मिळत असून आर्यन खानच्या सुटकेसाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. आता आर्यन खानच्या संरक्षणासाठी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. इतकेच नाही तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या भूमिकेच्या चौकशीची मागणीही शिवसेनेने केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका
शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्याकडे या प्रकरणी प्राधान्याने हस्तक्षेप करण्याचा आग्रह केला आहे. राज्य घटनेच्या कलम 32 नुसार तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आर्यन खानच्या मुलभूत हक्कांच्या उल्लंघनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून एनसीबी पक्षपात करुन फिल्म स्टार्स, मॉडेल आणि सेलिब्रिटींना त्रास देत आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाद्वारे आर्यन खान आणि इतर आरोपींच्या जामिनावरील निर्णय सार्वजनिक सुट्ट्यांचा हवाला देत 20 ऑक्टोबरपर्यंत टाळणे हा आरोपींचा मोठा अपमान आहे. आर्यन खानला बेकायदेशीररित्या 17 रात्री कारागृहात ठेवणे हे राज्यघटनेतील जीवन आणि स्वातंत्र्याच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाला मुलभूत हक्कांच्या उल्लंघनाबाबत कलम 32 नुसार या प्रकरणाची दखल घेणे महत्वाचे आहे.
Shiv Sena’s run in Supreme Court for Aryan Khan’s fundamental rights
महत्त्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या युवा नेत्याची गोळ्या झाडून हत्या
- विज्ञानाची गुपिते : तुम्हाला माहितंय….उन्हापासून कसे बनते ड जीवनसत्व…
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या दिल्या शुभेच्छा ; म्हणाले-पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्या
- T20 World Cup : विराट कोहली म्हणाला – ‘वर्ल्डकप स्पर्धेत मी रोहितसोबत ओपनिंगला येणार नाही’…काय आहे कारण?