• Download App
    मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिवसेना संपत चालली, चंद्रकांत पाटील यांचा आरोप|Shiv Sena is ending in the state for post of Chief Minister, alleges Chandrakant Patil

    मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिवसेना संपत चालली, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामपूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसने प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पाडाव सुरू केला आहे. तरी ते शिवसेनेच्या लक्षात येत नाही. मुख्यमंत्रिपदाच्या नादात शिवसेना संपत चालली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.Shiv Sena is ending in the state for post of Chief Minister, alleges Chandrakant Patil

    सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील भाजपच्या विजयी उमेदवारांचा सत्कार करताना पाटील बोलत होते. भल्याभल्यांचे मनसुबे धुळीस मिळवत भाजपने सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिळविलेले यश कौतुकास्पद आहे, असे सांगून पाटील म्हणाले, राज्यातील यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षचिन्हावर लढविणार आहोत.



    जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पृथ्वीराज देशमुख यांनी सग्यासोयऱ्यांची काळजी न करता पक्षहिताला प्राधान्य दिले. त्यामुळे अनेकांचे डावपेच उधळून लावत चार जागांवर विजय मिळाला. ज्यांचा पराभव झाला त्यांना ताकद दिली जाईल.

    Shiv Sena is ending in the state for post of Chief Minister, alleges Chandrakant Patil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !