प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.Shinde – Fadnavis government green light for various tourism projects from Lonavala to Gosikhurd!!
गोसीखुर्द येथे जलपर्यटन, नागपूर येथील सोनेगाव तलावाचे सुशोभीकरण, कार्ला लोणावळा येथे चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स, मिठबाव येथील गजबादेवी मंदिर सुविधा प्रकल्प यांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव आहे, पर्यटनाच्या अमर्याद संधी राज्यात उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.
गोसीखुर्द जलाशय येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. गोसीखुर्द जलाशयात ४५ कि.मी. जलप्रवास पात्र आहे. याठिकाणची नैसर्गिक विविधता, मोठ्या बेटांची आणि बंदरांची उपलब्धता असल्याने आंतरराष्ट्रीय जलपर्यटन करण्यात येणार आहे. देशातील सर्वोत्तम असा हा जलपर्यटन प्रकल्प वेळेपूर्वी जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
हा प्रकल्प भंडारा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर होत असून याठिकाणी सुरू असलेला अंभोरा मंदीर विकास प्रकल्प आणि जलपर्यटन प्रकल्प एकत्रित करण्याची सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक बैठकीस उपस्थित होते. तर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App