विशेष प्रतिनिधी
मुंबई :Shastrinagar कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली होती. आता या वाढत्या दबावानंतर, ज्यांच्यावर मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा मुख्य आरोप आहे, ते सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली आहे.Shastrinagar
रमेश म्हात्रे यांना डोंबिवली येथील विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह इतर चौघांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या दोन डॉक्टर, दोन परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना रमेश म्हात्रे यांच्याकडून झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या गंभीर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला केवळ तीन जणांना अटक केली होती. मात्र विरोधकांनी या प्रकरणावरून तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी लावून धरल्यानंतर, वाढत्या दबावामुळे अखेर मुख्य आरोपी रमेश म्हात्रे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.Shastrinagar
शिंदे गटाचे डोंबिवली पश्चिमेकडील कोपर परिसरातील माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह गुंडांसारखी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत रीतसर गुन्हा दाखल केला आणि तत्काळ कारवाई करत रमेश लक्ष्मण पवार (वय 50, रा. वडारवाडी, डोंबिवली पश्चिम), प्रकाश उद्धव निकम (वय 35, रा. सुंदरा आई आर्केड, कोपर रोड, डोंबिवली पश्चिम) आणि अक्षय शरद कारंडे (वय 30, रा. कलम श्री सोसायटी, कोपर क्रॉस रोड) या तीन आरोपींना अटक केली आहे.
Shastrinagar Hospital Assault: Former Shinde Faction Corporator Ramesh Mhatre Arrested
महत्वाच्या बातम्या
- पिनाका लांब पल्ल्याच्या गाईडेड रॉकेटची अचूक माऱ्याची चाचणी यशस्वी; सीमेपार दहशतवाद्यांचे अड्डे टार्गेट करणे सोपे!!
- अमरनाथ यात्रेत घातपाताचा संशय; तीन संशयीतांना फेशियल रेकग्निशन कॅमेऱ्यावरून ओळखून अटक!!
- भाजपची रणनीती : ठाकरेंच्या फुटीर नेत्यांना सत्तेचे गाजर; पण पवारांच्या सगळ्या नेत्यांना सत्तेचे मृगजळ!!
- सशक्त लोकशाहीत संवाद साधण्याखेरीज दुसरे करणार तरी काय??