नाशिक : मुद्दा ओल्या दुष्काळाचा आणि कर्जमाफीचा, पण शरद पवारांचा राष्ट्रवादी “स्वप्न” पाहते आहे, महाराष्ट्राचा “नेपाळ” करायचा!!, हे राजकीय सत्य आज खुद्द शरद पवारांच्या तोंडूनच बाहेर पडले.Sharad Pawar warned Nepal like violence in Maharashtra
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक मध्ये एक दिवसाचे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर घेतली. त्यानंतर आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढला. त्या मोर्चाला पवार समर्थक शेतकऱ्यांनी हजेरी लावली. राज्यात गेल्या दोन-तीन महिन्यात पडलेल्या तुफान पावसामुळे ओला दुष्काळ पडलाय. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मोर्चेकर्यांची मुख्य मागणी होती. त्यानुसार शरद पवारांच्या सकट सगळ्या नेत्यांनी ही मागणी उचलून धरली पण त्यापलीकडे जाऊन स्वतः शरद पवारांनी राष्ट्रवादीला महाराष्ट्राचा “नेपाळ” करायचाय, हे स्वप्न जाहीररित्या सांगितले. किंबहुना हे राजकीय सत्य त्यांच्या तोंडून आपसूक बाहेर पडले.
सगळी हत्यारे ठरली बोथट
मुद्दा कोणताही असो, महाराष्ट्रातले प्रचंड बहुमतवाले सरकार स्थिरपणे काम करू द्यायचे नाही. हे सरकार टिकू द्यायचे नाही, असा चंग सगळ्याच विरोधकांनी बांधलाय. त्यासाठी वोट चोरीपासून आरक्षणापर्यंतच्या सगळ्या राजकीय आणि सामाजिक हत्यारांचा वापर करून झालाय. पण महाराष्ट्रातले प्रचंड बहुमतवाले स्थिर सरकार हलविण्यात विरोधकांना जराही यश आले नाही. अगदी मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरच्या आंदोलनातून सुद्धा फडणवीस सरकारचे काही वाकडे झाले नाही. किंबहुना हायकोर्टाच्या रेट्यामुळे पाच दिवसांमध्ये आंदोलन गुंडाळावे लागले. त्यामुळे शरद पवारांना मनोज जरांगे यांची राजकीय किंमत कवडी सारखी करावीशी वाटली. जरांगेंच्या आंदोलनाशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला स्वतःचा कवडीचाही संबंध नाही, असे त्यांना पत्रकार परिषदेत सांगावे लागले. राज्यातले सरकार घालविण्यात अपयश आल्याची ती कबुली होती.
पवारांचा इशारा
पण नाशिक मधल्या आजच्या शेतकरी मोर्चात शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच देवाभाऊंना “देवाभाऊ” असे नाव घेऊन महाराष्ट्रात “नेपाळ” घडायचा इशारा दिला. आपल्या शेजारच्या नेपाळमध्ये काय घडले याच्या खोलात मी जात नाही तिथल्या राज्यकर्त्यांना कुठल्या परिस्थितीत जावे लागले, हे सगळ्यांना माहिती आहे. देवाभाऊ त्यांचे सहकारी नेपाळच्या घटनांमधून धडा घेतील, असे शरद पवार म्हणाले यातूनच त्यांच्यात मुखातून महाराष्ट्रात “नेपाळ” घडवायचे स्वप्न बाहेर आले.
नेपाळचा संदर्भ, पण तो अर्धवट
नेपाळमध्ये युवकांच्या आंदोलनाने तिथले माओवाद्यांचे सरकार घालविले. युवकांनी दोन दिवस जाळपोळी केल्या. पण नंतर तिथले युवक नेपाळच्या साफसफाईला देखील बाहेर पडले. जाळपोळीच्या घटनांबद्दल युवकांनी दिलगिरी व्यक्त केली. नेपाळमध्ये दोन दिवसांमध्ये शांतता निर्माण झाली. युवकांनी सामंजस्याने तिथल्या प्रश्न सोडविला. सुशीला कार्की यांच्यासारख्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पंतप्रधानपदी बसवून त्यांना सहकार्य करायचे मान्य केले. परंतु, शरद पवारांनी नेपाळचा संदर्भ फक्त जाळपोळी पुरता दिला. महाराष्ट्रात “नेपाळ” घडायचा इशारा दिला. याचा अर्थ पवारांनी नेपाळचा संदर्भ अर्धाच दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App