महाराष्ट्र निवडणुकीतल्या match fixing वर राहुल गांधींचा लेख; पवारांनी सकाळी काढला तो “बाजूला”; पण ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर दिली प्रतिक्रिया!!

नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊन 6 महिने उलटून गेल्यानंतर राहुल गांधींनी त्यावर मॅच फिक्सिंगचा लेख लिहिला. तो देशभरातल्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये आज छापून आला. राहुल गांधींनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर तो लेख शेअर केला. शरद पवारांनी मराठी वर्तमानपत्रांमधला तो लेख सकाळी “बाजूला” काढून ठेवला. तो लेख ते सायंकाळी शांतपणे वाचणार आहेत, असे त्यांनीच सांगितले. मात्र त्यांनी सकाळी ठाकरे बंधूंच्या ऐक्यावर आवर्जून प्रतिक्रिया व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होऊन सहा महिने उलटून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पूर्णपणे स्थिरस्थावर झाले. महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला टिकवता आले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच राहुल गांधी आणि शरद पवारांनी “मॅच फिक्सिंग” झाल्याची टीका केली होती, पण ती टीका त्यावेळी फक्त तोंडी केली होती. त्याच दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी मारकडवाडीचा एपिसोड घडवून आणला होता. त्याला सुरुवातीला राहुल गांधींनी प्रतिसाद दिला होता, पण नंतर तो एपिसोड लोकांच्या आठवणीतून संपून गेला.



आता मात्र राहुल गांधींनी सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत “मॅच फिक्सिंग” कसे झाले??, याचे सविस्तर वर्णन करणारा लेख लिहिला. त्यावर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ठाकरे बंधूंच्या युतीचीच चर्चा जास्त रंगली. त्याचे पडसाद आणि परिणाम यावर क्रिया – प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवायची अपेक्षा असणारा राहुल गांधींचा लेख मागे पडला.

– पवार काय म्हणाले??

राहुल गांधींचा लेख शरद पवारांनी सकाळी बाजूला काढून ठेवला. आपण तो संध्याकाळी शांतपणे वाचणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्या उलट ठाकरे बंधूंच्या एकीकरणाविषयी त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते पण त्या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होत नाही त्या उलट उद्धव ठाकरेंच्या सभांना गर्दी होते तिचे रूपांतर मतांमध्ये होते असे अति महत्त्वाचे निरीक्षण शरद पवारांनी आवर्जून नोंदविले. राहुल गांधींचा मॅच फिक्सिंग वरचा लेख मात्र पवारांनी सकाळी वाचला नाही तो ते सायंकाळी वाचणार आहेत आणि त्यानंतर ते प्रतिक्रिया व्यक्त करणार आहेत, असे त्यांनीच पत्रकारांना सांगितले.

Sharad Pawar set aside Rahul Gandhi’s article on match fixing, but reacted over Thackrey brothers unity

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात