• Download App
    Sharad Pawar praise Narendra Modi शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाची धडपड; सगळ्याच नेत्यांची सत्तेच्या तुकड्यासाठी तडफड!!

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाची धडपड; सगळ्याच नेत्यांची सत्तेच्या तुकड्यासाठी तडफड!!

    नाशिक : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा विलीनीकरणाची धडपड; सगळ्याच नेत्यांची सत्तेच्या तुकड्यासाठी तडफड!!, हे राजकीय वास्तव आज दोन महिन्यांनी पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले.

    पवारांकडून मोदींची स्तुती

    शरद पवारांनी कालच मुंबईतल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची स्तुती केली ते बाहेरच्या देशांमध्ये जाऊन भारताची प्रतिष्ठा वाढवत असल्याचे पवार म्हणाले पवारांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची तुलना इंदिरा गांधी नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाशी केली. पवारांनी आठवडाभरापूर्वीच देशातल्या अर्थव्यवस्थेबद्दल नरेंद्र मोदींना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका केली होती पण कालच्या मुंबईतल्या समारंभात पवारांनी मोदींच्या नेतृत्वाची स्तुती केली.

    राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विलीनीकरणासाठी आग्रह

    त्या पाठोपाठ शरद पवारांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत सगळ्याच नेत्यांनी आग्रह धरल्याची बातमी आली राष्ट्रवादीतल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर काम करताना अडचणी येत आहेत‌. सगळ्याच नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात विलीनीकरणाबाबत संभ्रम आहे तो संभ्रम लवकरात लवकर दूर करावा. शरद पवार विरणीकरणाबाबत जो निर्णय घेतील तो मान्य आहे पण विलीनीकरण करूनच राष्ट्रवादी काँग्रेस वाढवावी अशा आशयाचे मत सगळ्याच नेत्यांनी व्यक्त केले पवारांनी या सगळ्या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. मात्र महत्त्वाचे म्हणजे या बैठकीला आमदार रोहित पवार मात्र गैरहजर राहिले.



    रोहित पवार मात्र गैरहजर

    रोहित पवारांनी काहीच दिवसांपूर्वी विलीनीकरणाच्या संदर्भात आपली स्वतंत्र भूमिका जाहीर करून टाकली होती. शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण केले आणि ते भाजपबरोबर गेले तर आपल्याला स्वतंत्र निर्णय घेऊन वाटचाल करावी लागेल, असे रोहित पवार म्हणाले होते. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या बैठकीला ते गैरहजर राहिल्याचे दिसले कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून विलीनीकरणासाठी अनुकूल सूर येणार आणि कदाचित तो शरद पवारांना मान्य करावा लागणार हे रोहित पवारांना माहिती असावे. म्हणूनच त्यांनी त्या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असावा अशा अटकळी बांधल्या गेल्या आहेत.

     सत्तेच्या तुकड्यासाठी तडफड

    पण ते काही असले तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून विलीनीकरणाविषयी अनुकूल सूर उमटला असल्यास याचा अर्थच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते आता सत्तेशिवाय राहू शकणार नाहीत‌. सत्तेच्या तुकड्यासाठी त्यांना एक तर विलीनीकरण हवे आहे किंवा त्यांना स्वतंत्रपणे भाजपबरोबर जायची मूभा तरी हवी आहे. हेच राजकीय वास्तव आजच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतून समोर आले‌. शरद पवारांनी कालच मोदींची स्तुती करून आजच्या बैठकीची राजकीय पार्श्वभूमी तयार केलीच होती. त्याच पार्श्वभूमीवर आजची बैठक पार पडली आणि त्यामध्ये सत्तेच्या तुकड्यासाठी राष्ट्रवादीतल्या नेत्यांची धडपड सगळ्या महाराष्ट्राच्या समोर उघड्यावर आली.

    भाजप “हे” घडू देणार नाही

    पण असे असले, तरी भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या परवानगीशिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण शक्य होणार नाही. भाजप सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीतल्या नेत्यांना पूर्ण दमावल्याशिवाय विलीनीकरण घडवून आणू देणार नाही. कारण दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले, तर त्या पक्षाची ताकद वाढेल आणि भाजपसाठी मोठे आव्हान उभे राहील हे न समजायला भाजपचे नेते आता जुने आणि दूधखुळे राहिले नाहीत.

    Sharad Pawar praise Narendra Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मोदींनी मेलोडी चॉकलेटच्या एका पॅकेट मध्ये पटवली इटलीची पंतप्रधान; राहुल गांधींच्या बुडाला लागली जुनीच आग!!

    ज्येष्ठांना बाजूला सारून पवारांच्या नातवंडांची राजकारणात शिरायची धडपड; पण भाजप – शिवसेनेच्या युवा नेत्यांचे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संघटन!!

    Valmik Karad : वाल्मीक कराडची कारागृहात प्रकृती खालावली; आंबेजोगाई येथे हलवण्याची शक्यता