विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. त्यामुळे शरद पवार आता भारतीय जनता पक्षासोबत महायुतीमध्ये सामील होणार का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र या सर्व चर्चांना शरद पवार यांनी ब्रेक लावला आहे. संधिसाधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कोणासोबतही युती करा, मात्र भारतीय जनता पक्षासोबत नाही, असा थेट इशाराच शरद पवार यांनी दिला आहे.Sharad Pawar
या संदर्भात शद पवार यांच्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना ब्रेक लागला आहे. वास्तविक हा निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याचे शरद पवार यांनी याआधी सांगितले होते. मात्र, सुळे यांनी अशा युतीला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. आता थेट शरद पवार यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला ब्रेक लागला आहे.
या संबंधी बोलताना शरद पवार म्हणाले की, गांधी, नेहरू, चव्हाण यांचे विचार, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार जर सर्व म्हणत असतील तर ते मला मंजूर आहे. पण सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बरोबर बसायचे, ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा मात्र भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधिसाधूपणाचे राजकारण हे आपल्याला करायचे नाही. अशा स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.
या बाबत शरद पवारांनी मोठे विधान केले आहे. ‘कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध ठेवू नका, संधिसाधूपणाचे राजकारण करु नका, सत्तेसाठी भाजप बरोबर जाणाऱ्यांची साथ नको, अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी मांडली आहे.
प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार – अजित पवार
शरद पवार हे अजित पवार यांच्यासोबत महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. यामुळे अजित पवार यांच्या पक्षातील अनेक नेते मंडळींचा आनंद द्विगुणीत झाला होता. मात्र आता शरद पवार यांनी थेट भाजपसोबत जाणार नसल्याची भूमिका व्यक्त केली आहे. यावर अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. याव्यतिरिक्त इतर काही बोलणे मात्र अजित पवार यांनी प्रकर्षाने टाळले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App