नाशिक : राज्यसभेच्या बिनविरोध निवडणुकीची खात्री झाली, तरच शरद पवार अर्ज दाखल करणार का आणि पराभवाच्या भीतीने तसा निर्णय घेणार का??, असे दोन सवाल त्यांच्याच समर्थकांनी केलेल्या काही विश्लेषणावरून समोर आले.Sharad Pawar may not contest rajya sabha election due to fear of defeat
शरद पवारांचे सर्व पक्षांशी संबंध आहेत. ते ज्येष्ठ नेते असल्याने सगळ्याच पक्षातल्या नेत्यांना त्यांच्याविषयी आदर आहे. त्यामुळे त्यांची इच्छा असल्यास राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते, पण तरीसुद्धा ही निवडणूक बिनविरोध न होता तिच्यात मतदान झाले, तर त्यांना पराभवाचा धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार असेल, तरच शरद पवार राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करतील, अशा आशयाचे विश्लेषण त्यांच्या समर्थक पत्रकारांनी केले असून शरद पवारांना पराभवाचा धोका असल्याचे त्यातून सूचक पद्धतीने नमूद केले आहे.
– काँग्रेस आणि शिवसेना यांना पवारांविषयी शंका
शरद पवार यांना ज्येष्ठतेच्या निकषावर कदाचित काँग्रेस राज्यसभा उमेदवारीसाठी पाठिंबा देईल सुद्धा, परंतु नंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले, तर पवारांची राज्यसभेची खासदारकी आपोआपच सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) गोटात धरली जाईल म्हणजेच विरोधकांच्या एका जागेचा हक्क असून सुद्धा महाराष्ट्रातून ती जागा शरद पवारांच्या रूपाने गमावली जाईल, म्हणूनच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अतिशय हुशारीने शरद पवारांच्या राज्यसभा उमेदवारी विषयी भाष्य केले. शरद पवारांना पाठिंबा द्यायला हरकत नाही, पण त्याआधी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विलीनीकरणाच्या संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी रोटेशन नुसार राज्यसभेच्या जागेवर शिवसेनेचा हक्क सांगितला. त्यामुळे शरद पवारांच्या उमेदवारीला जेष्ठतेच्या निकषावर पाठिंबा असला तरी मुळातच काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना शरद पवारांच्या राजकीय प्रामाणिकपणाविषयी शंका आहे, म्हणूनच ते शरद पवारांच्या राज्यसभेच्या खासदारकीच्या उमेदवारीला आतून विरोध करत आहेत.
– विजयाची खात्रीच नसेल, तर पवारांची माघार
हे राजकीय वास्तव चित्र लक्षात आल्यामुळेच शरद पवारांनी अद्याप राज्यसभा खासदारकीच्या उमेदवारी विषयी स्वतःचे पत्ते उघड केलेले नाहीत. मात्र त्यांच्या समर्थकांनी दिल्ली आणि मुंबईत जोरदार लॉबिंग चालविले आहे. परंतु तसे लॉबिंग चालले असले, तरी दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडने आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या उमेदवारी विषयी कुठलाही शब्द उच्चारलेला नाही. त्यामुळे शरद पवारांना आपल्या विजयाची खात्री वाटत नाही आणि जिथे विजयाची खात्री वाटत नाही, तिथे शरद पवार निवडणुकीतच उतरत नाहीत हा माढा लोकसभा मतदारसंघातला अनुभव 2014 पासूनचा आहे. म्हणूनच शरद पवारांना राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल याची खात्री असेल, तरच ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, अन्यथा पराभवाच्या भीतीने ते निवडणुकीच्या मैदानात सुद्धा कदाचित उतरणार नाहीत, अशी दाट शक्यता मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App