विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 225 जागा निवडून आणण्याची घोषणा करणाऱ्या शरद पवारांना विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना निवडून आणता आले नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी अखेरच्या टप्प्यात शरद पवारांनी पाठिंबा दिलेले शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना पाडले. महाविकास आघाडीतल्या ठाकरे – पवार संघर्षाचा फटका छोट्या शेतकरी कामगार पक्षाला बसला.Sharad pawar could not make jayant patil’s victory in maharashtra MLC elections
विधान परिषद निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड देण्याऐवजी ठाकरे – पवारांच्या उमेदवारांमध्येच लढत रंगली आणि त्यात ठाकरेंच्या उमेदवाराने पवारांचा उमेदवार पाडला. काँग्रेसची 5 मते फुटली. प्रज्ञा सातव यांना दुसऱ्या पसंतीची 3 मते जादा मिळाल्याने मिलिंद नार्वेकर यांचा अखेरच्या टप्प्यात विजय झाला.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी सध्या मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके आणि योगेश टिळेकरांचा विजय निश्चित झाला. त्यापाठोपाठ शिवसेनेचे कृपाल तुमाने, भावना गवळी, राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आदी उमेदवार विजयी झाले. सदाभाऊ खोत दुसऱ्या पसंतीने निवडून आले.
पण मतमोजणीमध्ये पहिल्यापासून शेकपाचे जयंत पाटील पिछाडीवर होते. तीन फेऱ्यानंतरही जयंत पाटलांनी दुहेरी संख्याही गाठता आली नाही. पहिल्या पसंतीमध्ये शेकपच्या जयंत पाटील यांना फक्त 6 मते मिळाली होती. विजयासाठी 23 आकडा गाठावा लागणार होता. पण त्यांना फक्त 12 मते मिळाली. शरद पवारांच्या पाठिंब्याचा काही उपयोग झाला नाही. आपली पिछेहाट दिसत असल्यामुळे जयंत पाटील यांनी मतमोजणी केंद्र सोडून निघून गेले.
दुसरीकडे महायुतीमधील भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचे दोन्ही उमेदवार जिंकले. शिंदेंचेही दोन्ही उमेदवार विजयी झाले. त्यामुळे महायुतीच्या आमदारांनी जल्लोष केला.
कुणाला किती मतं मिळाली?
उमेदवार – मते
परिणय फुके – २६
मिलिंद नार्वेकर – २२
कृपाल तुमाने – २४
जयंत पाटील – १२
शिवाजीराव गर्जे – २४
सदाभाऊ खोत – १४ + दुसऱ्या पसंतीची 12
राजेश विटेकर – २३
प्रज्ञा सातव – २५
योगेश टिळेकर २६
अमित गोरखे – २६
पंकजा मुंडे – २६
राजेश विटेकर २१
भावना गवळी २४
शिवाजी गर्जे 24
Sharad pawar could not make jayant patil’s victory in maharashtra MLC elections
महत्वाच्या बातम्या
- माजी अग्निवीरांना जवानांबाबत गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय!
- ‘NEET’पेपर लीक किंगपिन रॉकीला अटक, ‘CBI’ला दहा दिवसांची कोठडी!
- Naxalites : गडचिरोलीत दोन महिला नक्षलवादींचे आत्मसमर्पण; तब्बल 16 लाखांचा ठेवण्यात आला होता इनाम!
- जयाप्रदा यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा, आचारसंहिता भंग प्रकरणातून निर्दोष मुक्तता!