• Download App
    शरदनिष्ठांनी निवडणूक आयोगात बदलली भूमिका; राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर दावा कायम!! Sharad pawar changed position in election commission, claims on election symbol again

    शरदनिष्ठांनी निवडणूक आयोगात बदलली भूमिका; राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर दावा कायम!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : निवडणूक चिन्ह गेले तरी काही आपल्याला फरक पडत नाही असा अनेकदा दावा करणाऱ्या शरद पवारांनी निवडणूक आयोगात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्ह बाबत भूमिका बदलली. राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह गोठवू नये. ते आम्हालाच द्यावे, असा युक्तिवाद शरदनिष्ठ राष्ट्रवादीने आज निवडणूक आयोगात केला. Sharad pawar changed position in election commission, claims on election symbol again

    पक्षाचे नाव किंवा निवडणूक चिन्ह याचा आपल्याला काही फरक पडत नाही. आपण वेगवेगळ्या चार चिन्हांवर आतापर्यंत लोकसभा अथवा विधानसभेत निवडून आलो आहोत. आपल्याबरोबरचे आमदार – खासदार सोडून गेल्यानंतर ते सगळे निवडणुकीत पडले आणि आपण नवीन माणसे निवडून आणली, असा दावा शरद पवार नेहमीच करतात.


    Sharad Pawar : 124 ए राजद्रोहाचे कलम रद्द करण्यासाठी राज्यसभेत बोलू!!; प्रकाश आंबेडकरांविषयीचा प्रश्न टाळला!!


    पण निवडणूक आयोगात मात्र अधिकृत भूमिका घेताना शरद पवारांनी आपली जाहीर भाषणांमधली भूमिका बदलली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील दाव्यात पक्षाचे निवडणूक चिन्ह घड्याळ न गोठवता ते आपल्याच गटाला द्यावे, असा युक्तिवाद शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. या युक्तिवादामुळे शरद पवारांनी निवडणूक चिन्ह बाबत दुटप्पी भूमिका घेतल्याचे ही स्पष्ट झाले.

    आजच्या युक्तिवादापूर्वी शरद पवारांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर दोन्ही गटांच्या युक्तिवादांना सुरुवात झाली. युक्तिवादापूर्वी निवडणूक आयुक्तांनी शरद पवारांना भेटीसाठी वेळ दिली ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

    Sharad pawar changed position in election commission, claims on election symbol again

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस