• Download App
    नुरा कुस्तीचा भांडाफोड; आमदार अपात्र ठरू नयेत म्हणून पवारांची कायदेशीर लढाईतून माघार; उज्ज्वल निकमांनी सांगितले इंगित!! Sharad pawar avoiding legal battle in NCP, ujjwal nikam tells the truth

    नुरा कुस्तीचा भांडाफोड; आमदार अपात्र ठरू नयेत म्हणून पवारांची कायदेशीर लढाईतून माघार; उज्ज्वल निकमांनी सांगितले इंगित!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सुप्रिया सुळे यांच्या पाठोपाठ शरद पवारांनी देखील अजित पवार आपलेच राष्ट्रवादीचे नेते असल्याचा खुलासा केल्यानंतर राष्ट्रवादीत नुरा नाही आणि कुस्ती नाही हे उघड झाले. पण या नुरा कुस्तीचा खरा भांडाफोड ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी केला.Sharad pawar avoiding legal battle in NCP, ujjwal nikam tells the truth

    शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कायदेशीर लढाई करायची नाही. राष्ट्रवादीचे कोणतेही आमदार अपात्र ठरू द्यायचे नाहीत म्हणून त्यांनी अजित पवारांना राष्ट्रवादीचे नेते मानले असावे, असे राजकीय इंगित उज्ज्वल निकम यांनी उघड करून सांगितले.

    आता यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी त्याचा कायदेशीर बाबींशी काही संबंध नाही, असे उज्वल निकम म्हणाले. त्याच वेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना जे काही कळवायचे ते कळविले आहे, असे म्हटले आहे. पण विधानसभा अध्यक्षांना त्यांनी नेमके काय कळविले आहे??, हे मात्र सांगितले नाही. पण त्यामुळे एकूणच पवारांना राष्ट्रवादीत कोणतीही कायदेशीर लढाई करायची नाही हेच आता तरी यातून दिसते असे उज्वल निकम यांनी स्पष्ट केले.

    देशाच्या विकासासाठी अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे आले आहेत, मग शरद पवार हे राहुल गांधींच्या मागे जाऊ शकतात का??, असा असा सवाल करून राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारही लवकरच अजित पवारांच्या पाठोपाठ भाजपबरोबर येतील, असा दावा केला आहे.

    तर अजित पवारांबरोबर मंत्रीपदाची शपथ घेतलेले अनिल पाटील यांनी अजित पवार आता लोकनेते झाल्यामुळे शरद पवारांनी त्यांना मान्यता दिली आहे, असे वक्तव्य केले आहे.

    Sharad pawar avoiding legal battle in NCP, ujjwal nikam tells the truth

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा

    Ketan Agrawal : पुणे हत्याकांडात दावा- केतनचे डोके चिरडलेले होते; रेस्क्यू टीमचा सदस्य म्हणाला- लोक रडत होते, पण सिया शांत होती; आई-वडिलांची चौकशी