अजितदादांची काल सिल्वर ओकला भेट, आज नाशकात शक्तिप्रदर्शन; काका – पुतण्याचे “गोळा बेरीज” राजकारण!!


नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवारांची काल सिल्वर ओकला भेट आणि आज नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन त्यातून काका पुतण्यांनी राष्ट्रवादीचे “गोळा बेरीज” राजकारण केल्याचेच दिसून येत आहे. आज अजितदादांनी नाशकात येऊन त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. Sharad pawar – ajit pawar double game politics at Detour of Modi BJP

छगन भुजबळ यांनी बांधलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाताना त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी फुले उधळली. शरद पवारांनी नाशिक येवल्यामध्ये मध्ये येऊन जे मोठे शक्तिप्रदर्शन केले होते, त्याला अजितदादांनी प्रत्युत्तर दिल्याने छगन भुजबळ यांच्या चेहऱ्यावर थोडे समाधान दिसले. त्यानंतर अजितदादा आणि छगन भुजबळ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समावेत शासन आपल्या दारी या कार्यक्रमात सामील झाले.

यशवंतरावांचे बेरजेचे राजकारण

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात “बेरजेचे राजकारण” हा शब्द रुजविला. प्रत्यक्षात त्यांनी फोडाफोडीचे राजकारण केले. त्याची “री” शरद पवारांनी पुढे ओढली. इतर राजकीय घरे फोडली पण स्वतःचे घर फुटू दिले नाही. अजितदादांची कालची सिल्वर ओकची भेट हे त्याचेच प्रत्यंतर होते. एकीकडे अजितदादांना आता आपण वाचवू शकत नाही आणि काही देऊ शकत नाहीत त्यामुळे पवारांनी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला पाठवून दिले आणि आता आपण राष्ट्रवादी नव्याने उभी करू, असे सांगत पक्ष संघटनेत आपले स्थान “दैवताचे” करून ठेवले.

अजितदादांनी भाजपच्या वळचणीला जाऊन उपमुख्यमंत्री पद मिळवल्यानंतर पहिले काही दिवसच शरद पवारांवर शरसंधान साधले. पण सुप्रिया सुळे यांनी श्रीनिवास पवारांना फोन करून जे “कौटुंबिक पॅचअप” केले, त्यानंतर अजितदादांनी किंवा त्यांच्या कॅम्पमधून अन्य कोणी शरद पवारांवर थेट निशाणा साधलेला नाही. उलट शरद पवार आमचे दैवत आहेत आणि आम्ही त्यांचे फोटो वापरणार असेच अजितदादा समर्थक आमदारांनी उघडपणे जाहीर केले. शरद पवारांनी देखील सुरुवातीला आपला फोटो वापरू नये यासाठी अजितदादांच्या आमदारांना धाक घालून पाहिला पण तो धाक कामाला आला नाही. त्यामुळे त्यांनी देखील तो विषय सोडून देत आपण आपली राष्ट्रवादी बळकट करू, असे जाहीर करून टाकले. शरद पवार आता उर्वरित राष्ट्रवादीला बळकट करून विरोधी ऐक्य साधणार आहेत हे काका पुतण्यांचे नुसते बेरजेचे राजकारण नसून “गोळा बेरीज” राजकारण आहे.

पुतण्याने मोदींच्या भाजपच्या वळचणीला बसून एकीकडे सत्तेचे लाभ घ्यायचे. त्यातून राष्ट्रवादीचे मर्यादित का होईना पण भांडवलीकरण करायचे आणि दुसरीकडे विरोधकांच्या कॅम्पमध्ये काकांनी आपले स्थान टिकवण्याचा प्रयत्न करून आपली राजकीय चलती अद्याप सुरू असल्याचे दाखवत राहायचे हे ते गोळा बेरीज राजकारण आहे.

– अटी भाजपच्या, अजितदादांच्या नव्हे!!

अर्थात या गोळा बेरजेतून तयार होणारा सत्तेच्या लोण्याचा गोळा किती मोठा असेल?, हा प्रश्नच आहे. कारण अजितदादा आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि केंद्रात अमित शाह या तीन नियंत्रकांच्या हाताखाली काम करणार आहेत. खरं म्हणजे त्यांना तसे काम करण्यापासून पर्याय नाही. कारण अजितदादांना भाजपने स्वतःच्या वळचणीला घेतले आहे, ते अजितदादा किंवा पवारांच्या अटींवर नव्हे तर स्वतःच्या अटींवर घेतले आहे. भाजपला स्वतःच्या अजेंड्याचे मोठे राजकारण साधायचे आहे. त्यासाठी अजितदादा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आणून बसवणे हा त्या राजकारणाचा छोटा भाग आहे. त्यामुळेच काका पुतण्यांनी कितीही “गोळा बेरजेचे” राजकारण केले, तरी मूळात त्यांचा सत्तेच्या लोण्याचा गोळा एक तृतीयांश एवढा घटला आहे आणि त्यातूनच त्यांना स्वतःच्या राष्ट्रवादीचे भांडवलीकरण करणे भाग आहे.

Sharad pawar – ajit pawar double game politics at Detour of Modi BJP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात