प्रतिनिधी
मुंबई:आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीसाठी कोर्टात प्रचंड गर्दी झाल्यानं संतापलेले न्यायमूर्ती नितीन सांब्रे थेट न्यायासनावरून उठून गेले. त्यामुळे न्यायालयीन कामकाज काही काळ थांबवावे लागले. कोविङ नियमावलीचे पालन करून कोर्टात फक्त केसची सुनावणी असलेल्यांनीच थांबावे असे आदेश न्यायमूर्तीनी पोलिसांना दिले.Seeing the crowd of hearing in the Aryan Khan case, the judge stood up; Crowd removed; Order to the police to comply with the coaching regulations
क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या जामिनावर आज सुनावणी होत आहे. या सुनावणीसाठी कोर्टात झालेली प्रचंड गर्दी पाहून न्यायमूर्ती संतापून न्यायासनावरून उठून गेले.
ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानला आज तरी जामीन मिळणार का, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. थोड्याच वेळात त्याच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. शाहरुख खानने आर्यनच्या सुटकेसाठी वकिलांची फौज उभी केली आहे. आर्यनच्या जामिनावरील सुनावणीसाठी कोर्टात आज मोठी गर्दी झाली होती.
Drugs on cruise case |Bombay High Court asked only limited people (those related to cases from matter number 45-55) to remain in court, to decongest the courtroom; asked Police personnel to ensure that courtroom is decongested Aryan Khan's bail application matter is serial no.57 pic.twitter.com/C8nNXXNIuz — ANI (@ANI) October 26, 2021
Drugs on cruise case |Bombay High Court asked only limited people (those related to cases from matter number 45-55) to remain in court, to decongest the courtroom; asked Police personnel to ensure that courtroom is decongested
Aryan Khan's bail application matter is serial no.57 pic.twitter.com/C8nNXXNIuz
— ANI (@ANI) October 26, 2021
आर्यन प्रकरणाशी संबंध नसलेल्या वकिलांनीही गर्दी केली होती. ही गर्दी पाहून न्यायमूर्ती नितीन सांब्रे न्यायासनावरून उठून गेले आणि करोना सुरक्षितता नियमांचे पालन करण्याची व्यवस्था करावी, असे त्यांनी कोर्ट असोसिएटना सांगितले. न्यायमूर्तींच्या आदेशानुसार गर्दी कमी केली आहे. ज्यांचे प्रकरण सुनावणीला नाही, त्यांना कोर्टाबाहेर जाण्याचे निर्देश असोसिएटने दिले आहेत. त्यामुळं न्यायालयीन कामकाज थांबवावे लागले.
असोशिएटच्या निर्देशानुसार पोलिसांनी आता सगळ्यांना बाहेर काढले. सर्व पत्रकारांनाही बाहेर काढले. आर्यनच्या प्रकरणाची सुनावणी सुरू होण्यापूर्वी पत्रकारांना प्रथम प्रवेश दिला जाईल, अशी हमी कोर्टाच्या असोसिएटने दिली आहे.
आर्यनच्या जामिनासाठी यापूर्वी अॅङ. सतीश मानेशिंदे, अमित देसाई यांनी युक्तिवाद केला आहे. आता ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आर्यनसाठी युक्तिवाद करणार आहेत. या प्रकरणासाठी त्यांची टीम लंडनहून आली आहे. एनसीबीनं आर्यनला जामीन मिळू नये म्हणून जय्यत तयारी केली आहे. सुनावणीआधीच प्रतिज्ञापत्र दाखल करत एनसीबीने आर्यनच्या जामिनास तीव्र विरोध केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App