Dada Bhuse : RTE विद्यार्थ्यांकडून शाळांनी कोणत्याही स्वरूपात पालकांकडून शुल्क घेऊ नये ; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची स्पष्ट भूमिका

Dada Bhuse

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Dada Bhuse सरकारने मोफत शिक्षणाचा अधिकार दिला असताना सुद्धा राज्यातील बऱ्याच शाळा अतिरिक्त शुल्क आकारतात.खासगी शाळा विविध प्रकारांची यादी दाखवत मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. मात्र आता यावर राज्य सरकारने कठोर आदेश दिला आहे. जर RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारलं तर अशा शाळांना आता राज्याचा दणका बसणार आहे. राज्यातील खासगी शाळांमध्ये ‘मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९’ (RTE) अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क वसूल करणे बेकायदेशीर आहे. जर कोणत्याही शाळेने शुल्काच्या किंवा शालेय साहित्याच्या नावाखाली पालकांकडून पैसे घेतले असतील, तर ते पालकांना परत करावे लागतील, अन्यथा संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत मांडली.Dada Bhuse

विधानसभेत सदस्य योगेश सागर यांनी आरटीई प्रवेशातील अडचणी आणि शाळांकडून होणाऱ्या सक्तीच्या वसुलीबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या सूचनेला उत्तर देताना मंत्री भुसे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. नियमानुसार, खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा आरटीई अंतर्गत राखीव ठेवणे बंधनकारक असून, या विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती शासन करत असते.Dada Bhuse



२९०० कोटींची प्रतिपूर्ती थकीत

शिक्षण मंत्र्यांनी मान्य केले की, राज्य पातळीवर शाळांची सुमारे २९०० कोटी रुपयांची शुल्क प्रतिपूर्ती सध्या थकीत आहे. मात्र, शासनाकडून निधी मिळण्यास उशीर होत असला तरी, त्याचा फटका विद्यार्थ्यांना किंवा पालकांना बसता कामा नये. शाळांनी या कारणास्तव विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

१ जुलै २०१५ च्या शासन निर्णयाची आठवण

मंत्री भुसे म्हणाले की, “या संदर्भात १ जुलै २०१५ रोजीच राज्य शासनाने स्पष्ट शासन निर्णय निर्गमित केला आहे. शाळांनी कोणत्याही स्वरूपात पालकांकडून शुल्क घेऊ नये, अशा कडक सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. ज्या शाळा या नियमाचे उल्लंघन करतील, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

शाळा बंद होणार नाहीत

काही शाळांनी निधीअभावी शाळा बंद करण्याच्या चर्चा सुरू केल्या होत्या, त्यावर स्पष्टीकरण देताना मंत्र्यांनी सांगितले की, “कोणतीही शाळा बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. येणाऱ्या काळात जसा निधी उपलब्ध होईल, तशी शाळांची प्रलंबित देयके टप्प्याटप्प्याने दिली जातील.” जर तुमच्या पाल्याचा प्रवेश आरटीई अंतर्गत झाला असेल आणि शाळा गणवेश, पुस्तके किंवा इतर साहित्यासाठी पैशांची मागणी करत असेल, तर पालक आता शिक्षण विभागाकडे तक्रार करू शकतात. संबंधित शाळांना ते पैसे परत करण्याचे निर्देश सरकार देणार आहे.

Schools should not charge any fees from parents of RTE students; Education Minister Dada Bhuse clear stance

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात