विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut छगन भुजबळ यांना काही अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री केलेले नाही. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री केले आहे. त्यांचे जातीय राजकारण आहे. ते पंतप्रधान असताना स्वत:ला ओबीसींचे नेते समजतात आणि त्यातून भुजबळांना मंत्रिपद देण्यात आले आहे. विखे पाटलांवर भुजबळ बोलत असतील तर ते राज्यातील मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.Sanjay Raut
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे त्यांचे आम्ही स्वागत करणार आहोत. आमची युती पक्की आहे. इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती तर मविआ ही विधानसभेसाठी तयार करण्यात आली होती. मनपा निवडणुकीसाठी अशी काही चर्चा झालेली नाही. मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.Sanjay Raut
.. राजकीय गुंड आहे हे जाहीर करा
संजय राऊत म्हणाले की, विखे पाटील यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांच्यावर जर भुजबळ टीका करत असतील तर ते मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे. तुम्हाला मंत्रिपद पाहिजे सरकारविरोधात लढायचे. एक तर तुम्ही राजकीय गुंड आहे हे जाहीर करा नाही तर मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळेल हे सांगा, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
पुण्यातील जागेचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या मामांपर्यंत
शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, मुंबई, पुणे, ठाणे तुम्ही कुणाच्या हाती देणार आहात. पुण्याच्या जैन समाजाच्या जागेचे प्रकरणात सर्व बाहेरचे लोक आहेत.या साडेतीन ते 4 हजार कोटी रुपयांच्या प्रकरणाचे धागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेले आहेत. हे लवकरच मी बाहेर काढणार आहे. यात किती मंत्री आहे, मुख्यमंत्र्यांच्या मामांपर्यंत हे प्रकरण कसे गेले हे पाहूयात लवकरच या गोष्टी समोर येतील.
म्हणून जाती जातींमध्ये वाद लावण्याचे काम
संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण करताना जपून करावे. रस्त्यावरील राजकारणात आम्ही तुमच्या आधीपासून आहोत. आम्हाला काही आयते मिळालेले नाही, असा इशारा राऊतांनी दिला आहे. मनसे-शिवसेना ठाण्यात एकत्र लढणार आहेत. दोन ठाकरे सबपे भारी, आमचा नारा 75 पारचा आहे. दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवणार. याचा खेळ संपत आला आहे. दोन ठाकऱ्यांनी ठरवले तर मुंबईचे रस्ते बंद होतील. जाती जातींमध्ये वाद लावण्याचे काम मुख्यमुद्यावरुन बाजूला करण्यासाठी सुरू आहे. ही पेशवाई सुरू आहे, तेव्हाही असे सुरू होते.
मराठी ऐक्याचा दीपोत्सव
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सांगितले की आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत. हे प्रत्येकानी लक्षात घेतले पाहिजे. मनसेचा दीपोत्सव हे मुंबईचे आकर्षण आहे.मराठी ऐक्याचा हा दीपोत्सव आहे. यापुढे मराठी माणसांच्या प्रत्येक प्रश्नामध्ये राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे काम करणार आहेत आणि मराठी माणसांना वैभव प्राप्त करुण देतील.
शरद पवार महाराष्ट्राची अस्मिता
संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकं काय मराठी नाही का? शरद पवार हे महाराष्ट्राची अस्मिता आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये काँग्रेसचे अनेक नेते होते. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एका उद्योगपतींकडून मुंबई गिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक मराठी नेत्यांची जबाबदारी आहे की मुंबई कुणाच्या घशात जाऊ द्यायची नाही. या लढाईसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी कुठेही मागे राहणार नाहीत. मनपाचा जागा वाटप हा काही मुद्दा नाही तर मतदार यादीमधील जो घोटाळा केला आहे तो मराठी माणसांची पिछेहाट करण्यासाठी भाजपकडून करण्यात आला आहे. आम्ही एकत्र आलो आहोत. मविआतील कोणत्याही पक्षाने एकत्र येण्यासाठी नकारात्मक भूमिका घेतली नाही.
काँग्रेसला लगावला टोला
संजय राऊत म्हणाले की, महा-विकास आघाडीमध्ये मनसेला घेण्याचा अधिकृत प्रस्ताव अजून देण्यात आलेला नाही. अशा प्रकारचा प्रस्ताव हा त्यांचा प्रश्न आहे. अजून कुणाचा हा प्रश्न नाही. त्यांचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामध्ये अनेक कमिट्या असतात. त्यांचा खूप मोठा पक्ष आहे, तो स्वातंत्र्य चळवळीतील पक्ष आहे, त्याच काळात वावरत आहे, असा टोला काँग्रेसला राऊतांनी लगावला आहे. मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असे नाही आम्ही स्वत: निर्णय घेत पुढे जात असतो.
भाजपचा रंग भ्रष्टाचाराचा
संजय राऊत म्हणाले की, आशिष शेलार यांनी राज ठाकरेंकडे चहा पिण्यासाठी जाऊ नये. भाजपचा रंग हा भ्रष्टाचाराचा झाला आहे. त्यांच्याकडे 90 टक्के काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांना आता भाजपचे नेते म्हणतात. भाजपकडे स्वत:चे असे काही नाही. त्यांनी स्वत:ची पोरं जन्माला घालावी. किती दिवस लोकांची पोरं सांभाळणार असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
जय अमित शहांवर टीका
संजय राऊत म्हणाले की,अफगाणिस्तानमध्ये जय अमित शहा नसल्याने त्यांनी प्रखर राष्ट्रवादी निर्णय घेत पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला. तिथे धर्म आणि राष्टापुढे पैशाचे व्यवहार चालत नाही. पण तिथे जर जय शहा असते तर हा निर्णय झाला नसता असे अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळण्याचा घेतलेल्या निर्णयावर बोलताना राऊतांनी म्हटले आहे. सोमय्याच्या बोलण्याकडे कुणी गांभीर्याने पाहत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App