विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्या मानहानी खटल्यात मुंबई सत्र न्यायालयाने ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा यांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.Sanjay Raut
मीरा भाईंदर शहरात २०२२ साली १५४ सार्वजनिक शौचालयं बांधण्याचे कंत्राट निघाले होते. त्यातील १६ शौचालयांचे काम मेधा सोमय्यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळाले होते. कामात बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप केला. मीरा भाईंदर पालिकेची फसवणूक केल्याचे म्हटले होते. यावर मेधा सोमय्या यांनी राऊतांच्या विरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.Sanjay Raut
आधी ठरवले होते दोषी
मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना दोषी ठरवत १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजारांचा दंडदेखील ठोठावला होता. या शिक्षेला संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर आज न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App