समीर वानखेडे यांनी दादर चैत्यभूमीवर जावून केले अभिवादन ; भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाखेडेविरोधात केली घोषणाबाजी

दरम्यान, भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे म्हणाले, ‘वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही.’Sameer Wankhede visited Dadar Chaityabhoomi and greeted; Bhim Shakti Republican Sena activists chanted slogans against Wakhede


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आज (सोमवारी ) मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर उपस्थिती लावली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते चैत्यभूमीवर आले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

समीर वानखेडे अभिवादन करून जाताना भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाखेडेविरोधात घोषणाबाजी केली.त्यामुळे समीर वानखेडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात हमरीतुमरी झाली.



दरम्यान, भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे म्हणाले, ‘वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही.’ यावेळी वानखेडेंनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती प्रसार माध्यमांतून मिळाली आहे.

या दोघांमध्ये नेमके काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकले नाही.यावेळी माध्यमांशी बोलताना वानखेडे म्हणाले की , ‘आज जो लढा सुरू आहे. त्यासाठी मला इथे प्रोत्साहन मिळत आहे.

Sameer Wankhede visited Dadar Chaityabhoomi and greeted; Bhim Shakti Republican Sena activists chanted slogans against Wakhede

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात