NIA Affidavit : मनसुख हिरेनच्या हत्येसाठी सचिन वाझेने दिले प्रदीप शर्माला 45 लाख!!


वृत्तसंस्था

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यात मनसुख हिरेनच्या हत्येसाठी तब्बल 45 लाख रुपयांचा सौदा करण्यात आला होता, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. हत्येचा कट पोलीस मुख्यालयात रचला  Sachin Waze paid Rs 45 lakh to Pradip Sharma for killing Mansukh Hiren

रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करणे आणि त्यानंतर त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन याची झालेली हत्या, या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे.प्रदीप शर्मा यांनी जामीन अर्ज मुंबई हायकोर्टात दाखल केला. त्यावर बुधवार, 4 मे रोजी सुनावणी झाली. त्यावेळी एनआयएने हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये मनसुख हिरेन यांच्या हत्येसाठी 45 लाख रुपयांचा सौदा झाला होता, असा धक्कादायक खुलासा केला.

या प्रतिज्ञापत्रात एनआयएने हा हत्येचा कट पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीतच रचला होता, असे म्हटले आहे. तसेच सचिन वाझे याने प्रदीप शर्मा यांना 45 लाख रुपये दिल्याचे म्हटले आहे.

Sachin Waze paid Rs 45 lakh to Pradip Sharma for killing Mansukh Hiren

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात