• Download App
    सचिनने शोधलाय नवा हिरा ! टीम इंडियाला मिळणार रशीद खानसारखा अव्वल क्रिकेटपटूSachin discovers new diamond! Team India will get top cricketers like Rashid Khan

    सचिनने शोधलाय नवा हिरा ! टीम इंडियाला मिळणार रशीद खानसारखा अव्वल क्रिकेटपटू

    मुलाची अप्रतिम गोलंदाजी पाहून सचिनही आश्चर्यचकित झाला आहे. त्याने मुलाच्या या अद्भुत कौशल्याचे कौतुक केले.Sachin discovers new diamond! Team India will get top cricketers like Rashid Khan


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सचिनने गुरुवारी (१४ ऑक्टोबर) एका मुलाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो लहान मुलाच्या लेग स्पिनला पाहून सचिन खूप प्रभावित झाला आहे. सचिनने या व्हिडिओमध्ये दिसणारा लहान मुलगा कोण आहे? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु एका मित्राने त्याला हा व्हिडिओ पाठवला आहे अस सचिन म्हणाला.

    या व्हिडिओ मध्ये मुले रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा गोलंदाजी करत आहे. गोलंदाजी करताना तो मुलगा फलंदाजाला त्याच्या लेगब्रेक फिरकीने चकवताना दिसत आहे. हा मुलगा अनेक प्रकारचे चेंडू टाकत असल्याचे दिसत आहे आणि या प्रकारच्या गोलंदाजीत चांगलाच पारंगत असल्याचे दिसत आहे

    मुलाची अप्रतिम गोलंदाजी पाहून सचिनही आश्चर्यचकित झाला आहे. त्याने मुलाच्या या अद्भुत कौशल्याचे कौतुक केले. सचिनने ट्विटमध्ये असेही म्हटले आहे की, ‘ अरे व्वा. मित्राकडून हा व्हिडिओ मला मिळाला. या लहान मुलाचे खेळासाठी असलेले प्रेम आणि आवड ही अद्भुत आहे.’

    सचिनने केलेल्या या पोस्टला आतापर्यंत ४४०० पेक्षा जास्त वेळा रिट्विट करण्यात आली आहे. इतकंच नाही तर ३४ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओ ला लाईक केले आहे. काहींनी तर अशी प्रतिक्रिया दिली आहे की , सचिनने राशिद खानसारखा प्रतिभाशाली फिरकीपटू सचिनने शोधला आहे.

    Sachin discovers new diamond! Team India will get top cricketers like Rashid Khan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CJP आंदोलन : शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामा घेण्याच्या अलिकडच्या सगळ्या गोष्टी मोदी सरकार कडून पूर्ण!!; कोणत्या त्या वाचा!!

    Sanjay Shirsat : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग दिला जातोय; संजय शिरसाट यांचा ठाकरे, राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा

    Chhagan Bhujbal : सरकारविरोधात मुद्दा मिळाला की विरोधक फायदा घेतात; ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, पोलिसांच्या भूमिकेवरही भाष्य