मोदी – शाहांना शिव्या ते नेत्यांची बंद खोलीत खुशी; चंद्रकांतदादांवर टीका करताना रोहित पवारांची भाषा घसरली

प्रतिनिधी

पुणे : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये एकमेकांवर शरसंधान साधनांची स्पर्धा लागली असताना राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एक वक्तव्य केले होते. एक वेळ आमच्या आईबापांना शिव्या द्या, पण मोदी शाहांना शिव्या देऊ नका ,असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा धागा पकडून चंद्रकांत दादांवरच शरसंधान साधताना शरद पवारांचे नातू राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची जीभ घसरली आहे. Rohit Pawar targets chandrakant patil over his remarks on modi – shah

आपल्या नेत्यांची जी काही खुशी करायची असेल ती बंद खोलीत करा. जाहीर भाषणांमध्ये नको, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले आहे. त्याचवेळी त्यांनी आईबाप हा आपल्या संस्कृतीतला आदराचा विषय आहे.



त्यांच्याविषयी बोलताना नेत्यांनी तोंडावर ताबा ठेवला पाहिजे, असा सल्ला देखील चंद्रकांतदादांना दिला. पण आपल्या नेत्यांची जी काही खुश करायची खुशी करायची असेल ती बंद खोलीत करावी, असे जे वक्तव्य केले त्यातून आपलीच जीभ घसरल्याचे रोहित पवारांच्या लक्षात आले नाही.

रोहित पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांवर शरसंधान साधण्याची स्पर्धाच लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

Rohit Pawar targets chandrakant patil over his remarks on modi – shah

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात