विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Rohit Pawar बारामती विमानतळावर झालेल्या अजित पवार यांच्या अपघाती निधनाप्रकरणी राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. “अजितदादांच्या अपघाताला महिना उलटूनही राज्य सरकारने सीबीआय चौकशीचा अधिकृत प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही,” असा खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसेच जय पवार यांच्यावरही दबाव असल्याचे रोहित पवार म्हणालेत. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.Rohit Pawar
रोहित पवार यांनी राहुल गांधींशी झालेल्या चर्चेत पोलिस प्रशासन आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “विमान दुर्घटना प्रकरणी डीजीसीएला (DGCA) कलम १२ अंतर्गत एक विशेष समिती स्थापन करण्याचा अधिकार आहे. ही समिती राहुल गांधींच्या नेतृत्वात असावी आणि या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने व्हावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांनीही या प्रकरणी निष्पक्ष तपासाची गरज व्यक्त केली.Rohit Pawar
सीबीआय चौकशीचा प्रस्ताव अडकला कुठे?
रोहित पवार यांनी राज्य सरकारला धारेवर धरताना सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा दाखला दिला. ते म्हणाले, “सुशांत सिंह प्रकरणात बिहार सरकारने प्रस्ताव दिला आणि दुसऱ्याच दिवशी सीबीआयने तपास सुरू केला. मात्र, अजितदादांच्या बाबतीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पक्षाने वारंवार मागणी करूनही, तसेच मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र देऊनही राज्य सरकारने अद्याप सीबीआयकडे प्रस्ताव पाठवलेला नाही. अशी माहिती आम्हाला मिळाली आहे.”
प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा
यावेळी रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही बोचरी टीका केली. “प्रफुल्ल पटेल स्वतः म्हणाले होते की, अजितदादांकडे असलेली शेवटची फाईल माझी होती. आज ते व्ही. के. सिंग यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहून त्यांना मदत करत आहेत का? दादांसोबत राहिलेल्या नेत्याने असा विश्वासघात करणे लोकांसाठी धक्कादायक आहे. सिंगला वाचवले नाही तर तो आपले नाव सांगेल, अशी भीती कुणाला तरी वाटत असावी,” असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला.
जय पवारांवर दबाव असल्याचा दावा
अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या संदर्भातही रोहित पवारांनी महत्त्वाचे विधान केले. “जय पवार यांना पत्रकार परिषद घेऊ नका, असे सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर नेमका दबाव कुणाचा आहे? भाजपने सांगितले की त्यांच्याच पक्षाने, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, पीडित कुटुंबाला बोलण्यापासून रोखले जात आहे, हे लोकशाहीसाठी घातक आहे,” असेही ते म्हणाले.
वेळ न मिळण्यावरून सरकारला टोला
“मी सीबीआय, डीजीसीए आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. मात्र, मी विरोधी पक्षाचा आमदार असल्याने कदाचित मला वेळ दिली जात नसेल. महाराष्ट्रात साधी एफआयआर (FIR) नोंदवली जात नाही, हे दुर्दैवी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
रोहित पवारांच्या भेटीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया
रोहित पवार यांच्या भेटीनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राहुल गांधी म्हणाले, “रोहित पवार यांनी आज माझी भेट घेऊन बारामती विमान अपघाताच्या तपासाबाबत गंभीर चिंता व्यक्त करणारे पत्र मला दिले. या दुर्घटनेत अजित पवार आणि इतरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणात कायद्याची मूलभूत तत्त्वे पाळली गेली नसल्याचे दिसत आहे आणि इतक्या गंभीर घटनेनंतरही एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, ही बाब चिंताजनक आहे. या घटनेची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App