विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा संबंध भोंदू अशोक खरातशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. भोंदू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादांसह महाराष्ट्रातील एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याने कुणाच्या सांगण्यावरून या फोटोंवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? असा सवाल रोहित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे.Ajit Pawar
भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. सध्या तो नाशिक पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याच्यावर नाशिक पोलिसांत तब्बल 10 गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे, तर उर्वरित 2 गुन्हे हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. खरातशी संबंध असल्याच्या कारणावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना प्रथम राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद व त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी उपरोक्त आरोप केला आहे.Ajit Pawar
कुणाच्या सूचनेनुसार फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला?
रोहित पवार यासंबंधी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही. भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय. या भोंदू खरातने कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता? हेही समोर येणं गरजेचं आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या महाराष्ट्रात कर्तृत्वापेक्षा आणि जनतेच्या कामांपेक्षा असल्या भोंदूगिरीवर विश्वास ठेवला जात असेल तर पुढच्या पिढीला काय संदेश जाणार आहे? हे प्रकरण जेवढं भयावह आहे तेवढंच महाराष्ट्राच्या भविष्यालाही घातक आहे. त्यामुळं या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा करणाऱ्या अंधभक्तांचे खरे चेहरे समोर यायलाच हवेत.
अशोक खरातला तुरुंगातच संपवण्याचा डाव
तत्पूर्वी, सकाळी रोहित पवार यांनी अशोक खरातला तुरुंगातच संपवण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. ते म्हणाले होते, खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंदू खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचं तर दुसरीकडं अजितदादांच्या अपघाताची इत्तंभूत माहिती असलेल्या व्ही के सिंगला काहीही झालं तरी वाचवायचं अशा चर्चा आहेत.
दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, पण सत्य दडपण्यासाठी कोणाचा जीव घेतला जात असेल किंवा सत्य दडपण्यासाठी कोणाला दोषातून वाचवलं जात असेल तर या दोन्ही बाबी योग्य नाहीत. अशी राजकीय रणनीती कुणी आखत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला हे अजिबात आवडणार तर नाहीच उलट लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास उडेल. सत्य लपवण्यासाठी एवढा अट्टहास का? अशाने सत्य लपणार आहे का? असो, ‘कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपवता येत नाही, ते कधीतरी बाहेर येतंच’ याचा अनेकांना विसर पडलेला दिसतोय, असे ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App